बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ
अवैध देशी दारू प्रकरणात एकास पकडले

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर
शेगाव । अवैध देशी दारू बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी एकास पकडून त्याचे ताब्यातून देशी दारूच्या शिश्या जप्त केल्या व त्याचेविरूध्द महाराष्ट्र दारू कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. शहर पोलिसांनी २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील एका हॉटेलसमोर आरोपी सुनील विजय तुंबे (३०) रा. आंबेडकर चौक शेगाव याची झडती घेतली असता त्याचेजवळील वायरच्या थैलीत देशी दारूच्या टँगो पंच कंपनीच्या ९० एमएल मापाच्या १७ शिश्या असा एकूण ६०५ रूपयांचा मुद्देमाल मिळून आला.
सरकारतर्फे फिर्यादी पोहेकॉ गणेश जगदेव वाकेकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरूध्द कलम ६५ ई मदाका नुसार गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास एएसआय गजानन गावंडे हे करित आहेत.



