महाराष्ट्र

डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे गरोदर तरुणीचा मृत्यू

डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे गरोदर तरुणीचा मृत्यू

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर

शेगाव. जिल्हा महिला रुग्णालय बुलढाणा व जिल्हा सामान्य रुग्णालय अकोला येथे उपचारासाठी भरती केलेल्या ईब्राहीमपूर ता. मोताळा येथील २१ वर्षीय गरोदर तरुणीचा डॉक्टरांकडून योग्य उपचाराअभावी मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना १३ ऑगस्ट रोजी घडली. याबाबत उपरोक्त दोन्ही रुग्णालयातील डॉक्टरांचा हलगर्जीपणामुळे विद्या नामक महिलेच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा आरोप मृतक महिलेच्या नातेवाईकांकडून लावण्यात आला आहे.

ईब्राहीमपूर ता. मोताळा येथील श्रीकृष्ण रामधन घोरपडे यांची २१ वर्षीय गरोदर मुलगी विद्या निलेश गावंडे रा. पहुरजिरा ता. खामगाव ही प्रसुतीसाठी सुमारे दिड महिन्यापूर्वी माहेरी वडीलाकडे ईब्राहीमपूर येथे आली होती. तिची प्रसुतीची तारीख १३ ऑगस्ट सांगितल्या गेली होती. तर ७ ऑगस्ट दरम्यान त्याला ताप आला असल्यामुळे मोताळा येथील डॉ. सपकाळ यांचे दवाखान्यात तपासणी करुन तिला जिल्हा महिला रुग्णालय बुलडाणा येथे नेले असता तेथे सुविधा नसल्याचे कारण पुढे करत त्यांनी या गरोदर महिलेस अकोला जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रेफर केले. तर येथे भरती करुन तेथे पण डॉक्टरांनी तिचा योग्य उपचार न करता अकोला सामान्य रुग्णालया प्रशासनाने त्यास खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला नाइलाजाने विद्येच्या योगीराज लेबॉरेटरीजमध्ये सर्व चाचण्या केल्या असता प्लेटलेट्स कमी झाल्याचे सांगून तिला नागपूर येथे जाण्याचा सल्ला देण्यात आला.

अखेर मृत्यूशी झुंज देत असलेल्या विद्येला नागपूर येथे नेत असतांना अमरावतीजवळ वाटेतच तिचा रात्री दिड वाजेदरम्यान ‘मृत्यू झाला. जिल्हा महिला रुग्णालय बुलढाणा व जिल्हा सामान्य रुग्णालय अकोलाकडून योग्य उपचार न मिळाल्यामुळे तेथील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे या गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button