महाराष्ट्र

हस्ते शिवसेना खामगाव तालुक्यासह गटाखालील पाच तालुक्यातील नियुक्तीपत्र देऊन नियुक्त जाहीर करण्यात आल्या.

दि. २०/०८/२०२३ रोजी विश्राम गृह शेगाव येथे शिवसेना नेते खासदार प्रतापराव जाधव साहेब यांच्या हस्ते शिवसेना खामगाव तालुक्यासह गटाखालील पाच तालुक्यातील नियुक्तीपत्र देऊन नियुक्त जाहीर करण्यात आल्या. प्रतिनिधी. राजेंद्र मुंडे.खामगाव तालुक्यातील शकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश व वेगवेगळ्या आघाड्यांच्या तब्बल ४२ नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवत खासदार प्रतापराव जाधव साहेब यांचा मोठ्या प्रमाणात युवकांशी असलेला दांडगा जनसंपर्क युवकांच्या मनाला भावत आहे.खामगाव तालुक्याला भेटलेल राजेंद्र बघे यांच्या रूपाने नवीन नेतृत्व व काम करण्याची पद्धत युवकांना मोठा प्रमाणात आवडलेल दिसत आहे. म्हणूनच शिवसेनेकडे मोठ्या प्रमाणात युवकांची फौजतयार होत आहे.विशेष करून खामगाव तालुक्यामध्ये शिवसेना जिवंत ठेवण्याचे काम निस्वार्थी असलेले शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय अवताडे यांनी केले आहे. म्हणूनच आज खामगाव तालुक्यामध्ये शिवसेना जिवंत आहे आणि मोठ्या प्रमाणात आता त्याचे जाडे पूर्ण तालुक्यामध्ये पसरत आहे.शहर प्रमुख रमेश भट्टड हे सुद्धा तज्ञ वकील असल्याकारणाने पक्षाला शहरात व ग्रामीण मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होत आहे.बुलढाणा जिल्ह्यात पक्ष बांधणी जिल्हाप्रमुख शांताराम दाने मार्गदर्शनात मोठ्या प्रमाणात चालू आहे.विशेष करून खामगाव तालुक्यातील युवक शिवसेनेकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button