युनियन बँकेचा कर्ज वितरण मेळावा उत्सवात! राधेश्याम चांडक म्हणाले, महिलांनी व्यवसाया त उत्तुंग झेप घ्यावी; संदीप शेळके म्हणाले, जिल्ह्याच्या विकासात महिला बचत गटांचे योगदान मोठे

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा
महिलांना बचत आणि चिकाटी या गुणांची नैसर्गिक देण लाभलेली आहे. उद्योग उभारणीत हे दोन्ही गुण महत्त्वाचे असतात. बचत गटांच्या महिलांनी बचत आणि चिकाटीच्या माध्यमातून व्यवसायात उतुंग झेप घ्यावी, असे प्रतिपादन बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी केले.
राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन अंतर्गत युनियन बँकेच्या बुलढाणा शाखेतर्फे महिला बचत गटांसाठी १२ सप्टेंबर रोजी कर्ज वितरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. मंचावर बुलढाणा अर्बन चे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. सुकेश झंवर राजश्री शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके, श्री वैद्य. श्री सोनटक्के, युनियन बँकेचे विभागीय व्यवस्थापक अनुप तराळे, शाखा व्यवस्थापक रवींद्र चोपडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना राधेश्याम चांडक म्हणाले, महिला सक्षमीकरणासाठी युनियन बँकेचे नेहमीच पुढाकार घेतला आहे. यावेळी १२७ महिला बचत गटांना ७ कोटी ५० लाख रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे. विविध सामाजिक उपक्रम राबविण्याकरता सुद्धा त्यांचा पुढाकार असतो. मेळाव्याला जिल्ह्यातील बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यशस्वी ते साठी युनियन बँकेचे अधिकारी. कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
जिल्ह्यातील खेडापाड्यात महिला बचत गटांचे जाळे विणले गेले आहे. एक आर्थिक चळवळ या माध्यमातून कार्यरत आहे. जिल्ह्याच्या विकासात महिला बचत गटांचे मोठे योगदान आहे. राजश्री शाहू परिवाराने महिला बचत गट चळवळीसाठी सदैव भरीव योगदान दिलेय. आतापर्यंत या माध्यमातून बचत गटांना ३५ हजार महिलांना १५९ कोटींचे अर्थ सहाय्य केले आहे. भविष्यातही महिला सक्षमीकरणासाठी आपला पुढाकार राहील. युनियन बँकेचे एका चांगल्या कार्यक्रमाचे
आयोजन केले. महिला बचत गटांना पाठवा देण्याची युनियन बँकेची भूमिका स्वागता ह असून त्याबद्दल राजश्री शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी बँक प्रशासनाचे कौतुक केले.



