शहर पोलीसांचा अनैतिक व्यापारावर छापा तिघा आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

शहर पोलीसांचा अनैतिक व्यापारावर छापा तिघा आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी
(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे )खामगाव रोडवर टिनपत्रा शेडच्या घरात सुरू असलेल्या अनैतिक व्यापारावर एसडीपीओ पथकाने दि. १४ ऑगस्ट रोजी छापा मारून तिघानां ताब्यात घेण्यात आले आहे.याबाबत प्राप्त माहीती अशी की, १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वा. सुमारास पोलीस अधिकारी विनोद ठाकरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पो. स्टे. शेगांव शहर चे ठाणेदार पो. नि. सुनील अंबुलकर यांनी एसडीपीओ पथकातील व पो.स्टे. अधिकारी व अंमलदार याचे सह शेगांव खामगाव रोडवरील हॉटेल विघ्नहर्ता इन हॉटेल जवळील टिनपत्राचे शेडच्या घरात राहणारा आरोपी शेख रफिक शेख शब्बीर यांचे घरात अनैतिक व्यापार प्रतिबंध संबंधाने छापा कार्यवाही पूर्वी एक बनावट ग्राहकाला पाठविले होते. त्या बनावट ग्राहकाला तेथे नमूद आरोपी हा त्याचे सोबत असलेल्या पीडितेकडून अनैतिक व्यापार करीत असल्याची खात्री करून रुमालाने इशारा करण्याबाबत कळविण्यात आले होते. त्याप्रमाणे बनावट ग्राहक त्या ठिकाणी गेला असता तेथे आरोपी शेख रफिक शेख शब्बीर वय ३८ वर्षे रा. इकबाल चौक ह. मु. होंटेल विघनहर्ता इन जवळ व अगोदर हजर असलेला एक ग्राहक आरोपी सुरेंद्र राजकुमार भेनवाल वय ३९ वर्षे रा. वरणगाव रामपेठ जिल्हा जळगांव खा, व २० वर्षाची पीडित मुलगी मिळून नि. २० वर्षाची पीडित मुलगी मिळून आली. सापळा पूर्व पंचनामा कार्यवाही मध्ये ठरल्या प्रमाणे बनावट ग्राहकाने तेथे आरोपी शेख रफिक यास अनैतिक कृत्यासाठी ५०० रु च्या २ नोटा दिल्या. तेथे आरोपीद्वारे अनैतिक व्यापार सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर बनावट ग्राहकाने घराबाहेर येऊनरुमालाने पोलीस व पंचांना इशारा केला. तेव्हा पोलिसांनी छापा कार्यवाहिमध्ये तिघांना पकडले. सदर आरोपितांकडून नगदी पैसे, मोबाईल व अनैतिक व्यापाराचे वापरासाठी असलेले मास्तव साहित्य तसेच पीडितेकडून मेकअपचे साहित्य पुराव्याकामी जप्त करण्यात आले. सदर प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पो. उप. नि. मनोज वासाडे यांनी दिलेल्या लेखी रिपोर्ट वरून दोन्ही आरोपितांविरुद्ध कलम ३, ४, ५ अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ प्रमाणे गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा पुढील तपास पो. नि. सुनील अंबुलकर हे करीत आहे. सदर छापा कार्यवाहिमध्ये पकडलेल्या दोन्ही आरोपितांना व पीडितेला वि न्यायालयासमक्ष पेश करण्यात आले. आरोपितांना वि न्यालायाद्वारे जिल्हा कारागृह बुलडाणा येथे रवाना करण्यात आले असून पीडितेचा संभाळ होणेबाबतची कार्यवाही सुरु आहे.



