पांगरी कुटे येथे शिवसेना शाखेची स्थापना

पांगरी कुटे येथे शिवसेना शाखेची स्थापना !वाशिम जिल्हा प्रतिनिधीअजय गायकवाड मालेगाव :- मालेगाव तालुक्यातील पांगरी कुटे येथे दिनांक १७ तारीख रोजी शिवसेना शाखेच्या नाम फलकाचे अनावरण शिवसेना जिल्हाप्रमुख महादेव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे खासदार भावना ताई गवळी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून,सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याच्या व गावाच्या विकासाच्या दृष्टीने युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे बाळासाहेब ठाकरे यांची विचार धारा पुढे नेत यशस्वी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जनहिताचे घेतलेले निर्णय आणि भावना ताई यांच्या प्रभावी नेतृत्तात शिवसेना जोमाने जिल्हाभर जनतेसाठी काम करित आहे असे या वेळी जिल्हाप्रमुख महादेवराव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितले यावेळी उपजिल्हाप्रमुख मंगेश महाराज घुगे,संपर्क प्रमुख प्रदीप पाटील कुटे,तालुका प्रमुख विलास जाधव,शहर प्रमुख संतोष बळी,माणिकराव गालट, गजानन केंद्रे,पवन इरतकर,विकास देशमुख,राजू भेंडेकर,सिद्धार्थ इंगळे या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती उपसर्कल प्रमुख सतीश मगर यांच्यासह गावातील सुरेश कुटे,शाखा प्रमुख अक्षय कुटे,गजानन बाविस्कर,गणेश कुटे,सागर कुटे,गोलू कुटे,अनिल आवटे,इत्यादी कार्यकर्ते हजर होते.



