शेतकरी कर्जमाफीबद्दल कृतज्ञता, समाजसेवेची बांधिलकी..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली तालुका : प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आ. श्वेता महाले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम..
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली विधानसभा मतदारसंघात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, हे सर्व उपक्रम चिखलीच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहेत. यामध्ये मातोश्री पांदन रस्ते योजनेमधून तयार झालेल्या शेतरस्त्यांचे भूमिपूजन, भव्य रक्तदान शिबिरे तसेच विविध जनहिताचे उपक्रमांचा समावेश आहे.
आमदार श्वेता महाले पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छांपुरते कार्यक्रम न ठेवता, समाजसेवा आणि विकासाला प्राधान्य देणारे उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार विधानसभा मतदारसंघातील विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आणि मातोश्री पांदन रस्ते योजनेमधून पूर्णत्वास आलेल्या शेतरस्त्यांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे राज्यात ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळाली आहे. त्यांच्या संकल्पनेतून प्रभावीपणे राबविण्यात आलेल्या मातोश्री पांदन रस्ते योजनेमुळे चिखली विधानसभा मतदारसंघात शेतरस्त्यांची अभूतपूर्व क्रांती घडून आली आहे. अनेक वर्षांपासून रस्त्याअभावी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत आता बारमाही रस्ते पोहोचले असून, शेतीमालाची वाहतूक, शेतीकामे आणि ग्रामीण दळणवळण अधिक सुलभ झाले आहे. या ऐतिहासिक विकासकामांचे प्रतीक म्हणून या शेतरस्त्यांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.याशिवाय रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना जीवनदान देण्✍️



