जळगावा जिल्हामहाराष्ट्र

देशाची फाळणी करून काँग्रेसने लोकांच्या मनात तिरस्काराची भावना निर्माण केली – रामदादा मोहिते. आ अँड फुंडकर यांच्या नेतृत्वात भाजपाने दुखावटा करीत काढला मुक मोर्चा.

*देशाची फाळणी करून काँग्रेसने लोकांच्या मनात तिरस्काराची भावना निर्माण केली – रामदादा मोहिते. आ अँड फुंडकर यांच्या नेतृत्वात भाजपाने दुखावटा करीत काढला मुक मोर्चा.

खामगाव:-* स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे काँग्रेसने देशाची फाळणी करून लोकांच्या मनात एकमेकांविषयी तिरस्काराची भावना निर्माण केली असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठनेते साहित्यिक रामदादा मोहिते यांनी केली. आज १४ ऑगस्ट फाळणी दिन निमित्त भाजपचे वतीने दुखवटा साजरा करीत आ अँड आकाशदादा फुंडकर यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयावर मुक मोर्चा काढला.त्यावेळी रामदादा मोहिते यांनी देशाचा काळा इतिहास सांगितला. पुढे बोलताना ते म्हणाले की देशाला स्वातंत्र्य १५ ऑगस्ट ला मिळालं तो सोनेरी होताच परंतु १४ ऑगस्ट ला देशाची ज्या परिस्थितीत फाळणी झाली ती अतिशय दुर्दैवी आहे. काँग्रेस ने नेहमी देशात हिंदू मुस्लिम यांचे मध्ये भांडणे लावली, संपूर्ण देशात दंगली घडविल्या आणि देशाची फाळणी केली. दोन धर्मात द्वेषाची बीजे पेरली , लाखो लोकांचा जीव दंगली मध्ये झाला. लाखो लोकांना आपले घर सोडावे लागले. हजारो लोक खायला अन्न नाही मिळाले म्हणून मरण पावले. कित्तेक दिवस उघड्यावर काढली. काँग्रेस चे नेते ऐशोआरामने जगत होते, तर दुसरीकडे निष्पाप जनता मरत होती. देशाचा हा काळा दिवस काळा इतिहास नेहमी आठवणीत राहावं व तरुण पिढी पर्यंत पोहचणे गरजेचे आहे. कारण आज सुध्दा काँग्रेस जातीवादी विचारसरणी ने काम करीत आहे. पुन्हा असे काँगेस चे दळभद्री सरकार येऊ नये याची सर्वांनी काळजी घ्यावी लागेल असे सुध्धा रामदादा मोहिते म्हणाले. आ अँड आकाश फुंडकर यांचे नेतृत्वात काढलेल्या या मोर्चात भाजप जिल्हा सचिव संजय शिनगारे, जिल्हा उपाध्यक्ष शरद गायकी, तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, कृ उ बा स संचालक विनोद टिकार , महिला आघाडी शहराध्यक्षा सौ रेखा जाधव, सौ भाग्यश्री मानकर, सौ शिवानी कुलकर्णी, भाजयुमो शहराध्यक्ष राम मिश्रा, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड, शहराध्यक्ष शुभम देशमुख, आदी माजी नगरसेवक, जि प, प स सदस्य , पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ———————————— *विभाजनाचे परिणाम आपण आजही भोगतोय – आ अँड फुंडकर* देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्ष झाली तरीसुध्दा आताही आपण देशाच्या फाळणीचे परिणाम भोगत आहोत . काँग्रेसने जी जनतेच्या मनात एकमेकांविषयी द्वेष निर्माण केला, तो आजही पाहायला मिळतो. आजही त्या वेदना पाहायला मिळतात हे दुर्दैव आहे. काँगेने जे फाळणी करते वेळी केले तेच जातीयवादी कट कारस्थान आज सुध्दा करीत आहे. आजच्या तरुण पिढीला फाळणीचा काळाकुट्ट इतिहास कळायला हवा यासाठी आज आम्ही दुखवटा दिवस म्हणून साजरा केला. आजच्या युवा पिढीने काळा इतिहास समजून घ्यावा व काँग्रेस चा खरा चेहरा ओळखावा असे प्रतिपादन यावेळी आ अँड आकाश फुंडकर यांनी केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button