महाराष्ट्रमुबई

आजार निमोनियाचा आणि उपचार अर्धांगवायुचे कळवा रुग्णालयातील प्रकार…

आजार निमोनियाचा आणि उपचार अर्धांगवायुचे कळवा रुग्णालयातील प्रकार…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहूरकर महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यु झाल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर सर्वत्र टिका होऊ लागली असतानाच, याच रुग्णालयातील रुग्णावर चुकीचे उपचार सुरु होते, अशी माहिती पुढे आल्याने खळबळ उडाली आहे. या रुग्णालयात एका महिलेला अर्धांगवायुच्या आजारावर उपचार सुरु होते. पण, खासगी रुग्णालयात हलविल्यानंतर तिला अर्धांगवायुचा नव्हे तर निमोनियाचा आजार असल्याची धक्कादायक मनसेने उघडकीस आणली आहे. यानिमित्ताने कळवा रुग्णालयातील भोंगळ कारभार समोर आला आहे.शकुंतला वाल्मिकी (६०) यांना त्यांच्या मुलाने कळवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्याबाबतीत हा प्रकार घडला आहे. त्यांच्यावर समान्य कक्षात तिच्यावर उपचार सुरु होते. तिथे दुसऱ्यादिवशी त्यांची प्रकृती गंभीर झाली. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात येणार होते. त्याच वेळी १८ जणांच्या मृत्युच्या बातमीमुळे त्यांचे नातेवाईक घाबरले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button