बुलढाणा

प्राणीशास्त्र विभागातर्फे डॉ.गोपाळराव खेडकर महाविद्यालयात विशेष मार्गदर्शन व्याख्यान*

*प्राणीशास्त्र विभागातर्फे डॉ.गोपाळराव खेडकर महाविद्यालयात विशेष मार्गदर्शन व्याख्यान*

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा व्हि.एम.घोडे तालुका प्रतिनीधी तेल्हारा दि.12 तेल्हारा येथील डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या प्राणीशास्त्र विभागातर्फे विशेष मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात आले.प्राचार्य डॉ. गोपाळ ढोले यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राणीशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. दीपश्री मथारिया यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. आर जी जाधव उपस्थित होते. ते सध्या स्व. नारायणराव अमृतराव देशमुख आर्ट्स कॉमर्स कॉलेज चांदुर बाजार येथे प्राचार्य, आणि श्री शिवाजी सायन्स कॉलेज अमरावती येथे प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. डॉ. जाधव यांनी प्राणिशास्त्र या विषयात पुढे काय काय संधी आहेत तसेच या विषयाबाबत अमूल्य असे मार्गदर्शन विद्यार्थी यांना केले. कार्यक्रमाला मंच वर प्राचार्य डॉक्टर गोपाळराव ढोले, प्रा. उदय देशमुख, प्रा. सुधीर देशमुख उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्राणिशास्त्र विषयाचे प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. तसेच विज्ञान विभागाच्या प्रा. रूपाली देशमुख, प्रा. राखी खारोडे, प्रा रसिका आवताडे, प्रा कीर्ती दबडघाव, प्रा. गजानन इंगळे, प्रा. अश्विनी देशमुख , प्रा. मल्ल उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. दीपश्री मथारिया यांनी केले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button