वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात शॉर्ट सर्किटमुळे लागली कापड दुकानाला आग

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात शॉर्ट सर्किटमुळे लागली कापड दुकानाला आग
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगांव : – शहरातील शिवचौक येथील परिसरात मन रोड असलेल्या तीर्थराज रेडीमेड कापड दुकानाला भीषण आग लागल्याने लाखोंचा माल खाक झाला ही घटना गुरुवारी रात्री १ वाजताच्या सुमारास घडली आग लागताच मालेगांव नगरपंचायतचे अग्निशमन पथक अवघ्या काही वेळातच घटनास्थळावर पोहोचून नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला या घटनेत लाखोंचा माल खाक झाल्याची माहिती आहे,शिव चौक मेन रोडला मार्केट असल्याने
बरीच दुकाने आहेत या मार्गावरील दुकानांतही प्रचंड गर्दी असते वाहनांनी गजबजलेल्या शिवचौक मेन रोड येथे तीर्थराज रेडीमेड कापड दुकान काही वर्षांपासून सुरू आहे या कापड दुकानाला गुरुवारी रात्री १ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली त्यामुळे मोठी तारांबळ उडाली नागरिकांची गर्दी उसळल्याने आग लागताच लगेच नगरपंचायतच्या अग्निशमन पथकाला पाचारण करण्यात आले पथक अवघ्या काही वेळात घटनास्थळावर पोहोचले पाण्याचा मारा करून आग विझविण्यास यश मिळविले मात्र,तोपर्यंत आगीत दुकानातील लाखो रुपयांचे कपडे जळून खाक झाले ही आग शॉर्टसर्किटमध्ये लागल्याचे बोलले जात आहे शुक्रवारी पोलिसांनी पंचनामा केला असून,पुढील तपास सुरू आहे.



