एसटी महामंडळाच्या अधिकारी वर्गाच्या मनमानी कारभारामुळे तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या दापोली आगारातील बससेवा बंद

एसटी महामंडळाच्या अधिकारी वर्गाच्या मनमानी कारभारामुळे तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या दापोली आगारातील बससेवा बंद
वाहतुक महाव्यवस्थापक व उपमहाव्यवस्थापकांकडे केली राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतूले यांनी केली तक्रार
दापोली:-दापोली आगाराकडुन चालवण्यात येणारी ०५.३०दापोली परळी,०७.०० दापोली शिर्डी,०९.०० अक्कलकोट,१६.३० दापोली मिरज विजापूर या बससेवा उत्पन्न कमी येत असेल बससेवा रत्नागिरी विभागाला चालवता येत नसतील तर सोलापूर,बीड,मिरज,अ.नगर विभागाकडून चालवण्याची मागणी प्रवासी संघटना शेगांव राष्ट्रीय सरचिटणीस श्री.वैभव बहुतूले यांनी पत्रात मागणी केली आहे
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर
दापोली शिर्डी,दापोली अक्कलकोट,दापोली अंबाजोगाई परळी वैजनाथ या बससेवा सुरु करण्यात याव्यात अशी मागणी वारंवार करण्यात आहे मात्र मा.श्री.प्रज्ञेष बोरसे विभाग नियंत्रक रत्नागिरी व विभागीय वाहतूक नियंत्रक श्री.सचिन सुर्वे मागणीकरांना खोट्या माहिती देउन आमच्याशी कसे खोटे बोलल्याचे दाखवण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे तरी ०५.३० दापोली परळी,०९.०० दापोली अक्कलकोट,१६.३० दापोली विजापूर या बस उत्पन्न नसल्याचे दाखवून बंद ठेवण्यात आलेल्या आहेत विभागीय वाहतूक नियंत्रक म्हणतात की हंगामा व्यतिरिक्त या बससेवा चालवणे हितावह नाही कोरोनानंतर किती हंगामात बस चालवल्या या देखील पत्रकार परिषदेत जाहीर करुन सांगावे आपण प्रवासी हितावह निर्णय घेण्यात किती इच्छुक आहात? प्रवासी वर्गाला हे देखील समजेल
०७.०० दापोली शिर्डी ही बस विभागीय नियंत्रक प्रज्ञेष बोरसे व विभागीय वाहतूक नियंत्रक सचिन सुर्वे यांनी वैभव बहुतूले यांना दिलेल्या पत्रात दापोली शिर्डी बस चालनात आहे त्यामुळे चालु करण्याची आवश्यकता नाही अभ्यास न करता देण्यात आलेली उत्तरे कशी दिली जाते पत्राच्या काॅपीसोबत महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक यांना देण्यात आली आहे विभागीय नियंत्रक व विभागीय वाहतूक नियंत्रक रत्नागिरी यांना माहित नसेल की दापोली शिर्डी बससेवा ही सेमी केल्यापासून पुणे पर्यंत चालवली जात आहे दापोली शिर्डी साध्या बसला जे उत्पन्न येत होते ते देखील पुणे पर्यंत चालवुन नाही दापोली येथुन शिर्डी,अक्कलकोट,परळी वैजनाथ,अंबाजोगाई येथे जाणाऱ्या प्रवासी वर्गात नाराजीचा सूर दिसुन येत आहे



