अहमदनगरमहाराष्ट्र

राहुरी वंचित आघाडीची बैठक उत्साहात संपन्न

राहुरी शहर अध्यक्षपदी ऋषिकेश साळवे यांची निवड

राहुरी

राहुरी नगर पाथर्डी विधानसभा पोटनिवडणूक तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राहुरी शहरातील र जेष्ठ नागरिक हॉलमध्ये दिनांक 28 फेब्रुवारी रोजी नवनिर्वाचित पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीत आगामी निवडणुकांसाठीची रणनीती, संघटन रचना बळकटीकरण, तसेच नवीन पदाधिकारी निवडीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पक्षाचे स्थानिक तसेच जिल्हा पातळीवरील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून निवडणूक तयारीला गती देण्याचा निर्धार व्यक्त केला.

बैठकीत प्रमुख उपस्थिती
जिल्हा महासचिव मधुकर साळवे जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ चोळके.तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव जिल्हा संपर्क प्रमुख पिंटूनाना साळवे तालुका संपर्क प्रमुख नागेश जाधव. संदीप कोकाटे पक्ष पदाधिकाऱ्यांनी आगामी काळात राहुरी व आसपासच्या परिसरात जनसंपर्क मोहीम वाढवून मतदारांपर्यंत पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याचे ठरविले.
राहुरी शहर अध्यक्षपदी ऋषिकेश साळवे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून अनेक पदाधिकारी यांनी जिल्हाध्यक्ष संतोष चोळके व तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button