खानदेशजळगावा जिल्हाजळगावा जिल्हा
महिला अत्याचारविरोधात महिलांनी काय करावे?

महिला अत्याचारविरोधात महिलांनी काय करावे?
मणिपूर ला तीन महिलांवर अत्याचार झाला.संपुर्ण भारत नव्हे जगात विरोध नोंदवला जात आहे.ही सामाजिक जाणिव.संविधानिक मार्गाने प्रधानमंत्री, गृहमंत्री, राष्ट्रपती यांनी कारवाई करावी.म्हणजे मणिपूर राज्य सरकार बरखास्त करावे.राष्ट्रपती राजवट लागू करावी.पोलिसांनी गुन्हेगार पकडले.कोर्टाने लवकर आणि कठोर शिक्षा द्यावी.ही कायदेशीर कारवाई.पण मग,माझ्या जळगाव शहरातील, जिल्ह्यातील , महाराष्ट्रातील महिलांनी काय करावे?
माझ्या जळगाव जिल्ह्यातील याच भाजपचे आमदार खासदार मंत्री नगरसेवक आहेत.हे लोकप्रतिनिधी जर अशा वेळी ढिम्म असतील तर यांना महिलांविषयी संवेदना नाही का?किंवा हे अत्याचाराचे समर्थक आहेत का?किंवा यांना भाजपने गुलाम,हबशी बनवून ठेवले आहे का?तर अशा आमदार खासदार मंत्री नगरसेवक यांना तुम्ही सरळ शिक्षा तर देऊ शकत नाहीत.पण पुढील निवडणुकीत मतदान करूच नये.कारण ही माणसे कशी आहेत?यांना मन, हृदय आहे कि नाही?हे आता कळून चुकले आहे.
जळगांव शहरामधे , जिल्ह्यामधे, महाराष्ट्र राज्या मधे अनेक राजकीय पक्षांनी , सामाजिक संघटनांनी आंदोलने केली.मोर्चा काढला.सरकारकडे निषेध नोंदवला.पण भाजपच्या आमदार, खासदार मंत्री नगरसेवकांनी का नाही नोंदवला?याचेही कारण शोधले पाहिजे.हे गुलाम आहेत का?हे अत्याचारी आहेत का?तशा घटना यांच्याबाबतीत ,यांच्याकडून घडल्या आहेत का? म्हणून हे चूप आहेत का?कि नरेंद्र मोदींनी यांना सुचना दिल्या असतील कि, तुम्ही चूप बसा ? असे अत्याचार करणे काही वाईट नाही.कि भाजप पक्षाच्या बायलॉजमधे लिहीलेले आहे कि,महिलांना नग्न करून धींड काढणे अत्याचार मानला जात नाही? तर जळगाव शहरातील, जळगाव जिल्ह्यातील, महाराष्ट्र राज्यातील महिलांना हे मंजूर आहे काय?
आम्ही लोकशाहीवादी पुरूष महिला आहोत.आपल्याला गुन्हेगारांवर शस्र चालवण्याचा अधिकार नाही.गुन्हेगारांची मदत करणाऱ्यांवर, बचाव करण्याऱ्यांवर सुद्धा शस्त्र चालवता येत नाही.पण अशांच्या विरोधात मत मांडण्याचा, विरोधात मत देण्याचा अधिकार मात्र नक्कीच आहे.जर एका महिलेवर अत्याचार होतांना आमदार खासदार मंत्री नगरसेवक हे ढिम्मपणे नपुंसक सारखे पाहात असतील तर महिलांनी अशांकडे कोणत्या नजरेने पाहिले पाहिजे?यांना कोणत्या स्थानी नेऊन ठेवले पाहिजे? लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत या ठिकाणी निवडून दिले पाहिजे का? हा विचार महिलांनी केला पाहिजे.जाहिर चर्चा केली पाहिजे.एकीने दुसरीला,दुसरीने तिसरीला समजावून सांगितले पाहिजे. हा सामाजिक, राजकीय,संविधानिक मार्ग उपलब्ध आहेच.त्याचा तंतोतंत आणि पुरेपूर वापर केला तर अनेक गुन्हेगारांना, सामाजिक असोत कि राजकिय असोत,लगाम लागू शकतो.पण जळगाव शहरातील, जळगाव जिल्ह्यातील, महाराष्ट्र राज्यातील महिलांनी मणिपूर मधील अत्याचार विरोधात निषेध नोदवला आणि येथे जळगाव मधील अत्याचाराला,अत्याचारीला समर्थन केले तर तो विरोध खोटा आहे,बेगडी आहे,नाटकी आहे,देखावा आहे.
जळगाव मधील महिलांनी भाजप नगरसेवकांना खडसावून विचारले पाहिजे कि, तुम्हाला मणिपूर मधील अत्याचार खटकत नाही काय?तो अत्याचार सुद्धा पक्षाच्या ध्येय धोरणांशी निगडित आहे काय? आमदार सुरेश भोळे, मंत्री गिरीश महाजन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खडसावून विचारले पाहिजे,का रे भो! तुला मणिपूर मधील अत्याचार बाबत चीड येत नाही काय?भाजपने उमेदवारी दिली, निवडून आणले म्हणून तू मिंधा झाला आहेस काय?तुझे मन, मेंदू,हृदय,काळीज जिवंत आहे कि नाही?
पण भारतीय महिला अशी चूक वारंवार करतात.आपल्या पक्षाचा उमेदवार अत्याचारी, भ्रष्टाचारी असला तरीही त्याचाच प्रचार करतात.त्यालाच मतदान करतात.येथेच महिलांची हार आहे.हेच कारण आहे, महिलांवरील अत्याचार थांबत नाहीत.भारतीय महिलांनी अनेक अत्याचारी, भ्रष्टाचारी, लिंगपिसाट उमेदवारांना मतदान केले आहे.जाणतेपणी.जाणिवपुर्वक.महिला असाच न्याय करीत असतील तर इतरांकडून न्यायाची अपेक्षा करू नका.
…शिवराम पाटील
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव



