मलकापूर शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये शासनाने स्वस्त धान्य ऐवजी रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतलेला

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
आहे, मात्र बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल ६३ हजार ४६० शेतकऱ्यांना बँक खातेच मिळालेले नसल्याने या समस्त शेतकरी बांधवांना लाभापासून वंचित रहावे लागत असल्याचे विदारक वास्तव आमदार राजेश एकडे यांनी आज २६ जुलै रोजी पावसाळी अधिवेशनादरम्यान औचित्याचा मुद्द्यावर विधिमंडळाचे समोर आणीत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
बँकेत खाते न मिळाल्याने तब्बल ६३ हजार ४६० शेतकरी धान्य ऐवजी मिळणाऱ्या रोख रकमेच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. तर आतापर्यंत केवळ ६ हजार २७३ शेतकऱ्यांनाच रोख रकमेच्या लाभ मिळालेला आहे. जानेवारी २०२३ पासून शासनाने ही योजना लागू केलेली आहे. परंतू तरीही आज रोजीपर्यंत बुलढाणा जिल्ह्यातील ६३ व ४६० हजार शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित असल्याचे चित्र निदर्शनास येत आहे. तर या योजनेमुळे दुसरीकडे शेतकऱ्यांचे धान्य सुद्धा बंद केलेले आहे. त्यामुळे धान्यही नाही आणि धान्याऐवजी रोख रक्कमही नाही अशाप्रकारे शेतकऱ्यांची जणू थट्टाच चालवली असल्याचे दिसत आहे. या चुकीच्या धोरणामुळे शासन व या योजनेबद्दल शेतकऱ्यांच्या मनात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर आता या योजनेचा लाभ आपणाला कसा मिळेल असा प्रश्नही शेतकऱ्यांना सतावू पाहत आहे. तरी शासनाने संभ्रम दूर करून शेतकऱ्यांना रोख रक्कम मिळण्याच्या दृष्टीने तात्काळ कार्यवाही कशी करता येईल या अनुषंगाने तातडीचे पाऊल उचलावे अशी आग्रही मागणी आमदार राजेश एकडे यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने विधिमंडळाच्या सभागृहात लावून धरली.



