वरुड बिहाडे येथील गरीब कुटुंबातील व्यक्ती सुधाकर अमृता वायकर यांच्या घरात घुसले पुरांचे पाणी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा तालुका प्रतिनिधी.
वरुड बिहाडे/तेल्हारा-: दि.21 जुलैच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे गावालगत असलेल्या नाल्याला आलेल्या पुराचे पाणी हे रात्री झोपेत असलेल्या अनेकांच्या घरामध्ये घुसले.वरुड गावातील बरीच कुटुंब गरीब असुन मोलमजुरी करणारी आहेत अचानक आलेल्या पुरामुळे वर्षभराकरीता साठवुन ठेवलेले धान्य व जिवना आवश्यक वस्तूची नासाडी झालेली आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत होवुन मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे.गावातील चधर्माळ प्लाट मध्ये राहत असलेले सुधाकर वायकर व त्यांचे कुटुंब यांचे घर जुने व मातीचे असुन पाणी शिरल्यामुळे मातीच्या भिंती जिर्ण झालेल्या आहेत व घरातील धान्याची व इतर वस्तुची नासाडी झालेली आहे. तसेच नाल्याच्या पुराचे पाणी गावातील अनेक घरात , दुकानात, हाॅटेलमध्ये व गुरांच्या गोठयात शिरले असुन नागरीकांचे व दुकानदारांचे मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.शेतकरी व गरीब कुटुंबाना शासकीय मदतीची अपेक्षा असुन शासनाने शेतकरी तसेच गरीब कुटुंबातील व्यक्तींना तातडीने मदत मिळावी अशी मागणी गावातील शेतकरी व गरीब कुटुंबातील सर्व साधारन व्यक्तिं कडुन होत आहे.



