मुक्ताईनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित जय स्कूल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आगळ्यावेगळ्या उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन सौ. रोहिणी ताई खेवलकर होत्या. मुख्याध्यापक चौधरी सर व उपमुख्याध्यापक शिर्के मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी चेअरमन यांनी “संविधान वाचन ही काळाची गरज आहे” असे सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपशिक्षक संजय ठाकूर यांनी संविधान वाचन घेतले, तसेच सर्व शिक्षकांनी संविधान पत्रिकेचे वाचन केले. शाळेच्या सभागृहात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सामूहिक संविधान वाचन हे पण घेण्यात आले
कलाशिक्षिका अर्चना भोळे यांनी साकारलेली डॉ. आंबेडकरांची रांगोळी प्रतिमा विशेष आकर्षण ठरली. उपस्थितांनी या कलाकृतीचे कौतुक केले.
यानंतर शाळेतून परिवर्तन चौकापर्यंत भव्य पायी फेरी काढण्यात आली. तेथे महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कलाशिक्षक मनोज सुरवाडे यांनी डॉ. बाबासाहेबांचा वेश परिधान करून कार्यक्रमात रंग भरला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाडे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एम. के. पाटील, परदेशी सर, धीरज खडसे सर व सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.



