बुलढाणामहाराष्ट्र

खरडुन गेलेल्या जमीनीचे तत्काळ पंचनामे करण्यासाठी तहसिलदार टोपे यांची घेतली भेट.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर

मुसळधार पावसामुळे सर्वत्र शेतातील पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. हजारो एकर जमीन पिकांसह खरडुन गेली,अनेक शेतातील स्प्रिकंलर संच, ठिबक सिंचन पाण्याच्या प्रवाहाने वाहुन गेले,अनेक जणावरे पुराच्या पाण्याने वाहुन गेले, काही गावात पाणी शिरल्याने घरे वाहुन गेले, घरांची पडझड अती प्रमाणात झाली आहे. यासर्व झालेल्या नुकसानीची शेतकरी शेतमजुरांना सरकारने भरिव मदत देण्यासाठी पंचनामे करावे. याकरीता महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यासाठी प्रशांत डिक्कर यांनी मा.तहसिलदार टोपे व तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोड यांचे सह संबधित अधिकाऱ्यांची काल रात्री ८ वाजता संग्रामपूर तहसिल येथे भेट घेतली. सविस्तर एक तास चर्चा केली. तालुक्यातील एकही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही याची ग्वाही मा तहसिलदार महोदयांनी दिली.व तत्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश तलाठी,कृषी सहायक,व गावपातळीवरील ग्रामसेवक यांना दिले आहेत. लवकरच नुकसानी पंचनामेचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे मा. तहसिलदार टोपे यांनी प्रशांत डिक्कर यांचे सोबत बोलतांना सांगितले. यावेळी तलाठी विनोद भिसे साहेब,सरोदे साहेब यांचे सह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button