बुलढाणामहाराष्ट्रसामाजिक
चिखलीत शिंदे हॉस्पिटल परिसरात लागली आग! आग विझवण्याचे काम सुरू…

चिखलीत शिंदे हॉस्पिटल परिसरात लागली आग! आग विझवण्याचे काम सुरू…
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा
चिखली शहरातील शिंदे हॉस्पिटल परिसरात असलेल्या गोडाऊनला आग लागली आहे. जालना रोडवर सौरभ जैन यांचे हे गोडाऊन आहे. दुपारी २ च्या सुमारास आज ही आग लागली.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हॉस्पिटलला लागून असलेल्या दहिगाव इंडियन च्या गोडाऊनला आग लागली. गोडाऊन मध्ये प्लास्टिकचे गठ असल्याने आगीचे रौद्ररूप धारण केले आहे. या प्रकारामुळे एकच खरबड उडाली असून अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी देखील घटनास्थळी बंदोबस्त तैनात केला असून आग विझवणे सुरू आहे. वित्तहानी झाली असली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.



