Uncategorized

पोलीस उपनिरीक्षक झालेल्या कु. प्रियंका काळे चे मिरवणुकीच्या माध्यमातून भव्य स्वागत खामगाव ::-

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे

खामगाव येथील सर्वसामान्य कुटुंबातील पोलिस उपनिरीक्षक झालेल्या कु प्रियंका काळे ही स्वगृही परतल्यावर तिची परिसरातील नागरिकांनी ढोल तश्याच्या गजरात भव्य मिरवणूक काढून स्वागत केले. नुकत्याच झालेल्या राज्यातील पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला , यामध्ये खामगाव शहरातील घाटपुरी नाका , दंडेस्वामी मंदिर परिसरातील अभयनगर येथील प्रकाश काळे यांची सुकन्या कु. प्रियंका काळे हिने या परीक्षेत यश संपादन करत पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदी निवड झाल्याबद्दल तिचे अभय नगर येथे वाजत गाजत मिरवणुकीच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले. यावेळी अभय नगर परिसरातील सर्व नागरिक प्रियंका काळे तिने साध्य केलेल्या यश संपादनाने गहिवरून गेले होते . तिचे परिसरातील महिलांनी ठीक ठिकाणी औक्षण करून स्वागत केले. परिसरातील नागरिकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. प्रियंका काळे ही नावाजलेली कबड्डी खेळाडू असून तिने जिल्हा , राज्य ,व केंद्र स्तरावर अनेक पदके मिळवली आहे. पोलिस उपनिरीक्षक होऊन तिने परिवारासह खामगाव शहराचे नाव लौकिक या स्पर्धेतून केलेले आहे . तिचे वडील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे एका अडत दुकानात मजूर आहेत. प्रियंका ही आ अँड आकाश फुंडकर यांचे स्वीय सहाय्यक पांडुरंग काळे यांची चुलत बहीण आहे. ————————————- – भाजयुमो व विद्यार्थी आघाडी कडून प्रियंकाचा सत्कार … पोलिस उपनिरीक्षक झाल्यानंतर पुणे येथून पहिल्यांदाच खामगाव येथे परत आलेल्या कु प्रियंका काळे हिचे स्वागत व सत्कार भारतीय जनता युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडी चे वतीने करण्यात आला. युवा मोर्चाचे नरेंद्र शिंगोटे, विध्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड, तालुकाध्यक्ष राज पाटील शहराध्यक्ष शुभम देशमुख, आशिष सुरेका , देवा गावंडे, शशांक वक्ते, प्रसन्न पिसे पाटील, निकुंज मंदानी, रिजवान भाई, आदी भाजयुमो व विध्यार्थी आघाडीचे पदाधिकारी यांनी प्रियंकाचा सत्कार व स्वागत केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button