बुलढाणामहाराष्ट्र

राजस्थान मध्ये बस अपघातात खामगावचे चौघे थोडक्यात बचावले

राजस्थान मध्ये बस अपघातात खामगावचे चौघे थोडक्यात बचावले, आ अँड फुंडकरांनी मदतीचा हात पुढे करीत केली विचारपूस खामगाव ::-

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे

राजस्थान मध्ये काल रात्री खाजगी बसच्या भीषण अपघात खामगाव मधील दुबे परिवारातील चौघे थोडक्यात बचावले, घटनेची या सर्वांची विचारपूस आ अँड आकाश फुंडकर यांनी केली. खामगाव येथील साई नगर येथे डॉ अशोक दुबे राहतात. त्यांचा मुलगा इंदोर येथे नोकरी करतो. डॉ दुबे हे आपल्या पत्नीसह काही दिवसांपूर्वी इंदोर गेले होते. त्यानंतर ते पत्नी, मुलगा व सून सोबत जयपूर राजस्थान ला देवदर्शनासाठी गेले होते. आणि काल ते परत इंदोर येथे परत येत असताना रात्री दोन वाजताच्या सुमारास कोटा राजस्थान येथे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले व बस वेगात पलटी झाली. यामध्ये 40 प्रवाशी जखमी झाले तर 5 ते 6 प्रवाशी गंभीर जखमी झाले . यामध्ये डॉ अशोक दुबे, त्यांच्या पत्नी सौ साधना दुबे, मुलगा भावेंद्र दुबे, व सून सौ नेहा दुबे हे सर्व सुदैवाने बचावले. ते सर्व किरकोळ जखमी झाले. या घटनेची माहीती मिळताच दुबे कुटुंबियांशी आ अँड आकाश फुंडकरांनी फोन वर संपर्क साधला व तब्बेतीची विचारपूस केली व मदतीचा हात पुढे केला. तसेच त्यांच्या मदतीसाठी तेथील प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. सर्व दुबे कुटुंब सुखरूप असल्याची माहिती आ अँड फुंडकर यांनी दिली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button