विकास कामांची व कल्याणकारी योजनांची माहिती प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवा– आ.रणधीर सावरकरभाजपची सुपर वॉरियरची बैठक संपन्न

विकास कामांची व कल्याणकारी योजनांची माहिती प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवा– आ.रणधीर सावरकर
भाजपची सुपर वॉरियरची बैठक संपन्न
स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
खामगाव::– मतदारसंघात केलेल्या विकास कामांची माहिती तसेच केंद्र व राज्य सरकारने जनतेच्या हितासाठी अमलात आणलेल्या योजनांची माहिती प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवा असे आवाहन भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
खामगाव विधानसभा मतदारसंघाची सुपर वॉरियर्स ची बैठक आज दिनांक 27 ऑक्टोबर रोजी स्थानिक साई जिनिंग येथे पार पडली त्यावेळी ते बोलत होते. आमदार रणधीर सावरकर यांच्यासह मंचावर भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख ,जिल्हा महामंत्री शरदचंद्र गायकी जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, ज्ञानदेवराव मानकर ,खामगाव विधानसभा विस्तारक डॉक्टर एकनाथ पाटील, विधानसभा प्रमुख संजय शिनगारे खवीस अध्यक्ष शिवाभाऊ लोखंडकार ,खामगाव तालुका अध्यक्ष सुरेश गव्हाळ ,शेगाव तालुकाध्यक्ष विजय भालतिडक या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार रणधीर सावरकर यांनी खामगाव विधानसभा मतदारसंघाचा पक्ष आढावा घेतला. यावेळी याप्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की खामगाव मतदारसंघात जलयुक्त शिवार योजनेमार्फत पश्चिम विदर्भात सर्वात जास्त कामे झाले आहेत. प्रत्येक गावाचे जोड रस्ते, अंतर्गत रस्ते ,विविध विकास कामे मोठ्या प्रमाणात झालेली आहेत. तसेच खामगाव मतदार संघातील बहुतांश भाग हा राष्ट्रीय महामार्गाची जोडण्यात आलेला आहे .असे अनेक लोकोपयोगी मूलभूत अशी कामे मोठ्या प्रमाणात आमदार आकाशदादा फोन कर यांचे अथक प्रयत्नातून झालेली आहेत त्यांची ही कामे प्रत्येक मतदारापर्यंत सतत संपर्काद्वारे पोहोचवावी तसेच अनेक कल्याणकारी योजना केंद्र व राज्य सरकारने गोरगरिबांसाठी तसेच समाजातील प्रत्येक घटकाकरिता अमलात आणलेल्या आहेत. त्या योजनांची सुद्धा माहिती सर्वांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. त्यासोबत या विविध योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात त्यांना लाभ मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणे गरजेचे आहे जेणेकरून गोरगरिबांचा आर्थिक विकास होईल. येणारा काळात सर्वच निवडणुका होणार आहेत ,त्यामुळे आतापासूनच प्रत्येक मतदारापर्यंत सतत संपर्क द्वारे प्रत्यक्ष भेटून व सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपाची विचारसरणी पोहोचविणे गरजेचे आहे .यासाठी तातडीने कामे कामाला लागा असे आवाहन सुद्धा यावेळी त्यांनी केले. तत्पूर्वी भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी खामगाव मतदार संघातील नियुक्त केलेले सुपर वॉरियर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरदचंद्र गायकी ,संचालन सुरेश गव्हाळ तर आभार प्रदर्शन राजेंद्र देवजी यांनी केले.



