महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तेल्हारा शहरामध्ये “एक सही संतापाची” हि मोहीम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तेल्हारा शहरामध्ये “एक सही संतापाची” हि मोहीम
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेलारा -तालुका प्रतिनिधी (विजय घोडे)
तेल्हारा दि.9- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष ,हिंदु जननायक राज साहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये तेल्हारा शहरांमध्ये एक सही संतापाची ही मोहीम राबविण्यात आली.
महाराष्ट्र राज्यामध्ये हल्लीची राजकारणातील बदलती स्थिती पाहता मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने तेल्हारा शहरांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तेल्हारा शहर अध्यक्ष श्याम भाऊ माहोरे यांच्या अध्यक्षते खाली "एक सही संतापाची" ही मोहीम राबविण्यात आली.
अग्रसेन टॉवर चौक तेल्हारा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा तेल्हारा शहर अध्यक्ष श्याम भाऊ माहोरे यांच्या हस्ते दुधा अभिषेक,जलाभिषेक,तथा पुष्पहार अर्पण व छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जयघोष करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
हल्ली महाराष्ट्राच्या राजकारणाची बदलती परिस्थिती पाहता मतदारांच्या विश्वासाचा विश्वासघात झाला आहे असे म्हणायला हरकत नाही म्हणून या याच गोष्टीचा सर्वत्र खूप संताप पसरला आहे. व महाराष्ट्रभर ही मोहीम राबवण्यात येत आहे. तेल्हारा शहरातील अनेक नागरीक या माेहीमे मध्ये सहभागी झाले व संतापाची एक सही करून आपला संताप व्यक्त केला. यावेळी उप तालुकाध्यक्ष प्रदीप भाऊ राजुस्कसर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी अकोला जि.अध्यक्ष राजेश भाऊ काळे ,उप.जिल्हाध्यक्ष श्रीरंग दादा तट्टे ,मा.शहराध्यक्ष मनोज गवळी व उप शहर अध्यक्ष दिलीप गावंडे,उपशहराध्यक्ष राज खारोडे शहर चिटनीस सागर सुर्यवंशी, शहर संघटक गोलू सोनटक्के , शहर सचिव रोहीत श्रीवास, जनहित विधी विभाग तालुका अध्यक्ष खुशल देव,व मोठ्या संख्येने मनसे सैनिक ,कार्यकर्ते स्वप्निल पांडे,वेदान्त देशमुख,ओम श्रिवास ,विकास गिरी ,साहील परदेसी ,संतोष वानखडे ,रोहीत उद्दमने,छोटू गोल्हार,गौरव रामेकर,सुपेश खोडे,मयुर चिनकर,अतूल वाळगे व गजानन महल्ले तथा पदाधिकारी उपस्थित होते. सर्व पदाधिकारी व मनसे सैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी उपस्थितांचे मनसे तेल्हारा शहर अध्यक्ष श्याम भाऊ माहोरे यांनी आभार मानले व कार्यक्रमाचे सांगता केली.



