मलकापूरमहाराष्ट्र
मलकापूर येथे पोलीस उपअधीक्षक कार्यालयाचे लोकार्पण

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
आज दिनांक 2 जुन 2023 रोजी मलकापूर येथे पोलीस उपअधीक्षक कार्यालयाचे श्री.सुनिलजी कडासने साहेब जिल्हा पोलीस अधिक्षक, बुलडाणा यांचे अध्यक्षतेखाली तर आमदार श्री.राजेशभाऊ एकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडला .
पोलीस स्टेशन मलकापूर शहर यांचेव्दारे आयोजीत केलेल्या शांतता समितीच्या बैठकीत आमदार राजेशभाऊ एकडे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या मलकापूर कार्यकाळातील जुन्या आठवणींना उजाळा देवून त्यांच्या कार्याचा गौरव केला. येत्या अधिवेशन काळात मलकापूर येथे पोलीस प्रशासनाकरीता भव्य ईमारत बांधकाम व पोलीस बांधवासाठी निवासी ईमारत बांधकाम आपण मंजुर करु असे आश्वासनही यावेळी आमदार महोदयांनी दिले.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुली व महीला गायब होण्याचे प्रमाणात दिवसेंदिस वाढत आहे याला पोलीस अधिक्षक साहेब आळा घालतील अशी आशा आमदार महोदयांनी व्यक्त केली.
यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक थोरात साहेब, ठाणेदार अशोक रत्नपारखी, तहसिलदार सुरडकर साहेब यांच्यासह पोलीस विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.



