महाराष्ट्र

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार मुलाचा मृत्यूवडील गंभीर

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगांव : 7 जुलै
नागपूर औरंगाबाद महामार्गावर चांडस ते कळमगव्हाण दरम्यान गुरुवार, 6 जुलै रोजी सायंकाळी 7.45 वाजेच्या सुमारास घडलेल्या अपघातात अज्ञात वाहनाने मोटारसायकलला समोरून दिलेल्या धडकेत मोटारसायकलवरील पिता-पुत्र गंभीर जखमी झाले होते. जखमींना 108 रुग्णवाहिकेने वाशिम येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. जिथे उपचारादरम्यान 20 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

या घटनेची माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्‍यातील शेलगाव देशमुख गावचे रहिवासी प्रकाश प्रभुजी नागरिक, वय 55 वर्षे आणि त्यांचा मुलगा निखिल प्रकाश, नागरिक वय 20 वर्षे. 6 जुलै च्या रात्री नागपूर औरंगाबाद महामार्गाने मोटरसायकल क्रमांक एम. एच. 28 बी. जी. 3080 ने जात असताना चांडस ते कळमगव्हाण गांवा दरम्यान असलेल्या फौजी ढाब्याजवळ त्यांच्या मोटरसायकलला समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने ते दोघेही गंभीर जख्मी झाले होते. अपघाताची होताच आजूबाजूचे लोक घटनास्थळी जमा झाले, कोणीतरी 108 रुग्णवाहिकेला फोन करताच रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी पोहोचली, डॉ.हेमंत जोरेवार व रुग्णवाहिका चालक दामोदर वानखेडे यांनी उपस्थित नागरिकांच्या मदतीने दोघांना रुग्णवाहिकेत टाकून वाशिम येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जिथे उपचारादरम्यान 20 वर्षीय मुलगा निखिल प्रकाश नागरीक याचा मृत्यू झाला. तर गंभीर जखमी वडील प्रकाश प्रभूजी नागरिक यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button