महाराष्ट्रविदर्भ

लोकसभा व विधानसभा निवडणुकी पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे रविवारी वाशिम जिल्ह्या दौऱ्यावर

डॉ. सुधीर कव्हर यांचे कार्यकर्त्याला उपस्थित राहण्याकरिता आव्हान..

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

वाशिम ; – आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणीसाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे राज्यव्यापी दौऱ्यावर असून ते दिनांक ९ जुलै रोजी वाशिम जिल्ह्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आव्हान जिल्हा प्रमुख डॉ. सुधीर कव्हर यांनी केले आहे.

शिवसेना महाराष्ट्र दौऱ्यावरील पहिला टप्पा रविवारी वाशिम जिल्ह्यातील श्री तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील श्री जगदंबा माता म्हणतांचा आशीर्वाद घेऊन सुरुवात होणार आहे.
यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना पश्चिम विदर्भ प्रमुख नेते खासदार अरविंद सावंत व वाशिम जिल्हा संपर्कप्रमुख दिलीप जाधव हे राहणार आहेत.

त्या अनुषंगाने रविवारी दुपारी पोहरादेवी येथे दर्शन घेणार असून त्यानंतर ते डिग्रस येथे वाशिम जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत लोकसभा व वाशिम जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा निवडणुकी संदर्भात चर्चा करणार आहे.
त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी युवासेना युती सेनेच्या सर्व पदाधिकारी शिवसैनिकांचा संवाद मिळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यास शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित रहावे असे आव्हान यावेळी जिल्हाप्रमुख डॉ. सुधीर कव्हर यांनी केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button