Uncategorized

.श्री गणेश विद्यामंदिर दातिवली दिवा या शाळेत आषाढी एकादशी कार्यक्रम व पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन .

दिवा – ( सचिन शेलवले ) दिनांक 28/6/2023 रोजी शिवदत्त ज्ञान प्रसारक मंडळ संचलित श्री गणेश विद्या मंदिर शाळेत हॉलमध्ये आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला . या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष लिलावती म्हात्रे मॅडम, सचिव साईनाथ म्हात्रे, दिनेश म्हात्रे, केतकी म्हात्रे मॅडम, गिता म्हात्रे मॅडम तसेच प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अनिल भोईर सर व्यासपिठावर उपस्थित होते . संस्थेचे सचिव साईनाथ म्हात्रे सर यांच्या हस्ते विठोबा रखुमाई मुर्तीचे पुजन करून त्या मुर्तीला पुष्पाहार घालण्यात आला . त्या समवेत प्राथमिक विभागाचे सर्व शिक्षक वृंद तसेच माय मदर इंग्लिशचे सर्व शिक्षक वृंद यांचासुद्धा सहभाग होता . श्री गणेश विद्यामंदिर मधल्या प्राथमिक विभागातील इयत्ता १ ली ते ७वी पर्यंत च्या निवडक विद्यार्थ्यांनी तसेच माय मदर इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांनी पंढरपुरच्या विठूवर आधारीत अनेक अभंग पेटी, ढोलकी, टाळ यांच्या तालासुरात लयबद्ध म्हंटली . पंढरपुरचा पांडुरंग महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठोबा यावर आधारीत अनेक अभंग विद्यार्थ्यांनी तालासुरात म्हंटली . ज्यामुळे सर्व वातावरण प्रसन्न प्रफुल्लीत झाले होते . सर्व विद्यार्थी प्रेषक वर्ग तसेच गायक वारकरीच्या वेषात नटून थटून आले होते . सर्वांनी भजनाचा आनंद ,आस्वाद घेतला . जणू काही पंढरपुर च्या विठोबाचे दर्शन सर्वाना मिळालेअसे वाटते . मंदिरा जवळ असलेली पालखी सजवून त्यामध्ये विठठ्ल रखुमाईची मुर्ती ठेवण्यात आली . त्या मुर्तीचे पुजन करून विठोबा वर आधारीत आरत्या तालासुरात घेण्यात आल्या .पालखी सोहळ्यात सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विठोबाची पालखी श्री गणेश विद्यामंदिर शाळेतून रस्त्याने दातीवली मार्गाने मुंब्रा देवीच्या विठोबा मंदिरा पर्यंत प्रस्थान झाली . या पालखी सोहळ्यात सर्व विर्चार्थ्यांनी दिंडी काढुन ढाल ताशाच्या गजरात टाळांचा गजर करून वारकरी बनून नामाचा गजर करत, वरून पावसाचा वर्षाव चालू असताना सुद्धा मंदिरापर्यंत रांगेने गेले . तेथील मंदिरातील कमिटीने शाळेचे तसेच संस्था चालकांचे स्वागत करून आभार मानले . त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना प्रसाद वाटण्यात आला . तेथून पालखी दातिवली मार्गे पुन्हा शाळेत आली . अशा प्रकारे आषाढी एकादशी कार्यक्रमाचा शेवट झाला .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button