खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र

भारत जोडो अभियान पूर्व नियोजनाची महत्त्वपूर्ण बैठक लोक संघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे

भारत जोडो अभियान पूर्व नियोजनाची महत्त्वपूर्ण बैठक लोक संघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर मध्ये संपन्न. (स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस मुक्ताईनगर तालुका प्रतिनिधी ):-सविस्तर वृत्त असे की दिनांक 24 जून रोजी मुक्ताईनगर मधील शासकीय विश्रामगृह येथे भारत जोडो अभियानाची नियोजित बैठक संपन्न झाली.मुक्ताईनगर मधील विविध पक्षांचे,समविचारी संघटनेचे प्रतिनिधी या बैठकीला आवर्जून उपस्थित होते.आगामी काळात जळगांव ला होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यकर्ता संमेलनाची पूर्व तयारी करण्यासाठी ही बैठक महत्त्वाची होती.या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. वाढती बेरोजगारी,धार्मिक दंगली,जातीय ध्रुवीकरण, राजकारणाचे बदललेले स्वरूप,वाढलेली महागाई अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.या बैठकीमध्ये लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा ताई शिंदे यांनी नियोजित संमेलनाची माहिती सर्वांना दिली.या संमेलनाची हेतू,उद्देश सर्वांना समजावून सांगितला तसेच सर्वांना या होणाऱ्या संमेलनाचे आमंत्रण दिले.या बैठकीमध्ये काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना(ठाकरे गट),विविध समविचारी पुरोगामी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. काँग्रेसचे डॉ. जगदीश बहुजन मुक्ती पार्टी राज्य संघटक प्रमोद सौंदळे निखिल चौधरी, मराठा सेवा संघाचे दिनेश कदम मन्यार बिरादरी जिल्हाध्यक्ष हकीम चौधरी ,आरिफ रब्बानी,बी. डी.गवई, ॲड.अरविंद गोसावी,गुलाबराव पाटील उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकर मोरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.या बैठकीला शिवसेना तालुकाप्रमुख ठाकरे गटाचे अजय जैन,अक्षय पालवे,अरविंद बोदडे रवी भाऊ हीरोळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button