महाराष्ट्रमुक्ताईनगर
बहुजन मुक्ती पार्टीच्या मुक्ताईनगर नगर तालुका युवक अध्यक्षपदी उचंदा येथील मनोज इंगळे तर उपाध्यक्षपदी जयराज इंगळे यांची नियुक्ती

बहुजन मुक्ती पार्टीच्या मुक्ताईनगर नगर तालुका युवक अध्यक्षपदी उचंदा येथील मनोज इंगळे तर उपाध्यक्षपदी जयराज इंगळे यांची नियुक्ती
(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस मुक्ताईनगर तालुका प्रतिनिधी) :-
सविस्तर वृत्त असे की बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत दादा ओव्हाळ यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रभरातील लोकसभा मतदारसंघात परिवर्तन यात्रेचे नियोजन केले गेले होते त्या अनुषंगाने 23 जून रोजी रावेर लोकसभा मतदारसंघातील मुक्ताईनगर या ठिकाणी बहुजन मुक्ती पार्टी ची सभा आयोजित करण्यात आलेली होती यामध्ये काही तरुणांनी बहुजन मुक्ती पार्टीमध्ये प्रवेश केला त्यापैकी बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ता असलेले उचंदा तालुका मुक्ताईनगर येथील रहिवासी मनोज सिताराम इंगळे यांची बहुजन मुक्ती पार्टी युवा अध्यक्षपदी तसेच बहुजन मुक्ती पार्टी युवा उपाध्यक्षपदी जयराज दिलीप इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली स्वतः प्रदेशाध्यक्ष श्रीकांत दादा ओव्हाळ, बहुजन मुक्ती पार्टी राज्य संघटक प्रमोद सौंदळे, जिल्हाध्यक्ष राजू खरे ,जिल्हा समन्वयक प्रमोद पोहेकर विधानसभा प्रभारी राजू वानखेडे, तालुका अध्यक्ष बिजलाल इंगळे ,यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले



