बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

हरविलेली मुलीचा घेतला शेगांव शहर पोलीसांनी शोध व दिले तिला आईच्या ताब्यात.

हरविलेली मुलीचा घेतला शेगांव शहर पोलीसांनी शोध व दिले तिला आईच्या ताब्यात.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर

आज दिनांक २४/०६/२०२३ रोजी भावीक भक्त श्री. नंदकिशोर पंढरी तिजारे रा. हिंगणघाट जिल्हा वर्धा हे त्यांचे पत्नी व ६ वर्षाचे लहान मुलीसह श्री. गजानन महाराज मंदिर परीसर शेगांव येथे दर्शनाकरीता आले होते. दर्शनाकरीता जात असतांना भाविक भक्तांचे वर्दळीत त्यांची ६ वर्षांची मुलगी कुठेतरी हरवीली. तेव्हा त्यांनी लगेच मुलीचा शोध घेण्यासाठी मंदिर पोलीस चौकी गाठली असता मंदिर चौकीतील पोलीसांनी त्यांची मुलीचे शोध कार्यवाहीसाठी कार्यतत्परता दाखवुन मंदिर परीसरात मुलीचा शोध घेण्यासाठी सतत लाऊडस्पीकर वर अनाऊन्समेंट केली, चौकीतील ईतर पो. स्टाप व मंदिराचे सेवाधारी यांचे मदतीने लगेच मुलीचा शोध घेऊन तिला तिचे आई वडीलांचे ताब्यात दिले. मुलीचे शोध कार्यवाहीसाठी पो.का. उद्धव कंकाळ, यांनी कौतुकास्पद तत्परता दाखविल्याने शोध कार्यवाहिमध्ये त्यांचे मोलाचे योगदान लाभले. हरवलेली मुलगी मिळाल्याने व्याकुळ झालेल्या आईचे आनंदाश्रु अनावर झाले व त्यांनी पोलीस व सेवाधाऱ्यांची मन:पुर्वक आभार मानले.तरी सद्यस्थीतीत मो.सा. चोरी, सोन्याचे पोथ, गळ्यातील दाग दागीने, पाकीट मारी, मोटार सायकल चोरी व लहान मुले मुली हरविण्याचे, पळविण्याचे प्रकार पाहता श्री. संत गजानन महाराज मंदिरात येणाऱ्या भाविक भक्तांना आव्हाहन करण्यात येते की, दर्शनाकरीता येत असतांना आपले लहान मुला मुलींचा काळजीपुर्वक संभाळ करुन आपले दाग दागीने, पाकीट, पर्स, मोटार सायकल, मौल्यवान वस्तु चोरी किंवा लुट होणार नाही या दृष्टीने सुरक्षीततेबाबत खबरदारी घ्यावी, आपणासोबत अशी कुठलीही दुर्घटणा होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button