खानदेशमहाराष्ट्रमुबई
अंबरनाथ येथे लोकल रुळावरून घसरली, कल्याण-कर्जत दरम्यानची लोकल सेवा विस्कळीत.

अंबरनाथ येथे लोकल रुळावरून घसरली, कल्याण-कर्जत दरम्यानची लोकल सेवा विस्कळीत..
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहूरकर
रविवारी सकाळी ८.२५ वाजता अंबरनाथ येथे रिकाम्या लोकलच्या एका डब्याचे एक चाक साइडिंगमध्ये रुळावरून घसरले. घटनेची माहिती संबंधित रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळताच, घटनास्थळी कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. त्यानंतर लोकलचे चाक रुळावर आणण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या घटनेमुळे कल्याण ते कर्जत दरम्यानच्या लोकल सेवेचे वेळापत्रक बिघडले आहे. तसेच डाऊन एलटीटी – विशाखापट्टणमला अंबरनाथ येथे थांबून ठेवले आहे. तसेच एक डाऊन बदलापूर आणि अंबरनाथ लोकलला उल्हासनगर येथे थांबविले आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.



