दक्षिण आफ्रिकेत झालेल्याम्यारोथान स्पर्धेत सहभाग घेतल्या बद्दल सत्कार समारंभ संपन्न

दक्षिण आफ्रिकेत झालेल्या
म्यारोथान स्पर्धेत सहभाग घेतल्या बद्दल सत्कार समारंभ संपन्न
कारंजा तालुका प्रतिनिधी
कारंजा – येथील उप विभागीय अधिकारी ललित कुमार वऱ्हाडे साहेब यांनी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या 90 कीलोमीटर कॉम्रेड म्यारोथान स्पर्धेत भारता तर्फ सहभाग घेऊन ही स्पर्धा सतत 10.42 तास धावून यशस्वी केली. त्यांचा या यशाने कारंजा तालुक्याची मान उंचावली व सिरपेचात मानाचा तुरा रोवल्या गेला
त्या बद्दल कारंजा जेसीज क्रीडा संकुल व गुडमॉर्निंग परिवार तर्फ दि.17/06/2023 शनिवार ला जलतरण तलाव येथील हॉल मध्ये त्यांचा छोटेखानी कौटुंबिक वातावरनात सत्कार समारोह संपन्न झाला.
मंचकावर मा. श्री अरविंदजी लाठीया अध्यक्ष कारंजा जेसीज क्रीडा संकुल, हे अध्यक्ष स्थानी होते.सत्कारमूर्ती मा.ललित वऱ्हाडे साहेब उपविभागीय अधिकारी , मा.झालटे साहेब तहसीलदार कारंजा , व मा.सुधाकरराव जाधव साहेब उपस्थित होते.
प्रास्ताविक व साहेबांचा परिचय मुकुंद साहेब यांनी केले.
सत्कारमूर्ती ललीतजी वऱ्हाडे साहेबांचा सत्कार कारंजा जेसीज चे अध्यक्ष अरविंदजी लाठीया व सचिव रवींद्र शाहाकार यांनी शाल ,श्रीफळ,व पुष्पगुच्छ देऊन केले.
तसेच गुड मॉर्निंग ग्रुपतर्फे माजी न.प.अध्यक्ष विजय बगडे, डॉ.अजय कांत, व अनिल अग्रवाल यांनी सत्कारमूर्ती ललीतजी वऱ्हाडे साहेबाचा सत्कार केला. त्यानंतर कारंजा तहसील चे तहसीलदार श्री. झालटे साहेबांचा सत्कार शाम सेठ अग्रवाल, शेखर बंग, डॉ.कांत यांनी शाल,श्रीफळ,पुष्प गुच्छ देऊन केला.
अशोक इन्नाणी ,सुधीरभाऊ लुंगे, नंदू सुराणा, गोपाल काजे व स्विमिंग टॅंक वरील स्टाफ, अ. राजिक शेख यांनी साहेबांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
सत्काराला उत्तर देताना वऱ्हाडे साहेबानी,आपले अनुभव व म्यारेथान स्पर्धे बाबत माहिती दिली, आणि सरावाने सर्व श्यक्य आहे. अशक्य काहीच नाही असे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले ,या नंतर तहसीलदार साहेबानी आपले मनोगतातून जीवनात खेळाडूंवृत्ती असणे आवश्यक आहे. आपली शरीर प्रकृती उत्तम राहण्यासाठी नियमित व्यायाम करावा. असे युवकांना आव्हान केले।
अध्यक्षीय भाषण अरविदजी लाठीया यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणातून कारंजा जेसिज जलतरण तलाव व जेसीज गार्डन विषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्र संचलन सुर्यकांत जीरापुरे यांनी केले. आभार प्रदर्शन माजी.न.प.अध्यक्ष ऍड.विजयजी बगडे यांनी केले. कार्यक्रमाला जेसीज क्रीडा संकुल व गुड मॉर्निंग परिवारातील सदस्य, व महसूल विभागातील कर्मचारी वृंद कार्यक्रमा करिता उपस्थित होते.



