मोदी@९महा जन संपर्क अभियान अंतर्गत कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवा — आ अँड आकाश फुंडकर*

*मोदी@९महा जन संपर्क अभियान अंतर्गत कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवा — आ अँड आकाश फुंडकर* स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे खामगाव :– ३० मे ते ३० जून या कालावधीत राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे पी नड्डा* यांच्या नेतृत्वात देशभर लोकसभा मतदारसंघा मध्ये मोदी@9 हे विशेष महा जनसंपर्क अभियान संपन्न होत असून जिल्हा, मंडल, शक्तीकेंद्र, बूथ पातळीवर वेगवेगळे कार्यक्रम मोठया प्रमाणात राबवा असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ अँड आकाश फुंडकर यांनी केले आहे. *पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजीच्या* नेतृत्वात भारताची प्रतिष्ठा जगभरात उंचावत असून भारताचा सांस्कृतिक वारसा जागतिक पातळीवर पोहचला आहे. देशातील पायाभूत सुविधा विकासाचे जाळे अधिक मजबूत करून आधुनिक भारताचे स्वप्न प्रत्त्यक्षात साकारत आहे. या अभियानात लोकसभा, विधानसभा मतदार संघात बूथ स्तरावर व्यापक जनसंपर्क, लाभार्थी संपर्क, समाजातील विविध घटकांशी संपर्क, जेष्ठ कार्यकर्त्यांशी संपर्क अश्या कार्यक्रमातून मोदी सरकारच्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांची माहिती सामान्य जनते पर्यंत पोहचवली जाणार आहे. आपल्या खामगाव विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित केले आहे. यामध्ये दिनांक १८ जून सकाळी ११ वाजता “संपर्क से समर्थन” प्रत्येक विधान सभा मतदारसंघात ५० प्रभावशाली कुटुंबाशी संपर्क* समाज घटकातील प्रभावशाली व्यक्ती ,खेळाडू, कलाकार,डॉक्टर,उद्योगपती, हुतात्मा सैनिक तसेच अन्य कुटुंबाशी संपर्क करणे., डब्बा पार्टी, टिफिन बैठक, अंगत पंगत कार्यक्रम जनुना तलाव येथे आयोजित केला आहे. दुपारी १ वाजता प्रत्येकाने आपल्या घरून जेवणाचे डबे आणून सोबत बसून जेवण करावे व सर्व कार्यक्रमाची चर्चा करावी.20 जून सकाळी १० वाजता घरोघरी संपर्क अभियान, मोदीजी सरकारच्या ९ वर्षांची* कारकिर्दीची माहिती पत्रके घरोघरी वितरण करणे.२० जून सकाळी ११ वाजतालाभार्थी संमेलन व*दुपारी १वाजताव संयुक्त मोर्चा संमेलन*सर्व मोर्च्यांचे पदाधिकारी यांचा मेळावा.*दोन्ही कार्यक्रमाचे ठिकाण कोल्हटकर स्मारक मंदिर राहणार आहे. तर२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन* कार्यक्रम शक्ती केंद्रस्तरा पर्यंत आयोजित करावे. शहराचा मुख्य कार्यक्रम सकाळी ६.३० वाजता नाना नानी पार्क येथे होईल,खामगाव ग्रामीणचा मुख्य कार्यक्रम *घाटपुरी ,सुटाळा* वशेगाव ग्रामीणचा कार्यक्रम कृ उ बा स मध्ये होणार.,जेष्ठ कार्यकर्ता संमेलनजेष्ठ कार्यकर्ता यांच्या सोबत स्नेहभोजन व संवाद करणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी-व्हिडियो कॉन्फरन्स २३ जून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी पुण्यतिथी साजरी करणे व मोदीजी सोबत १० बुथवर व्हिडियो कॉन्फरन्स. सर्व कार्यक्रम वेळेवर व मोठ्या प्रमाणात घावे असे आवाहन आ अँड आकाश फुंडकर यांनी केले आहे.



