पारंपारिक वैदीक परंपरेला फाटा देत सत्यशोधक पद्धतीने केला गृहप्रवेश..*

*पारंपारिक वैदीक परंपरेला फाटा देत सत्यशोधक पद्धतीने केला गृहप्रवेश..* ~प्रकाश पाटील *कुणबी समाजोन्नती संघ,मुंबई शाखा शहापूरचे* शेंद्रुण येथील सदस्य *शिवश्री.मोहन देऊ पाटोळे* यांच्या गृहप्रवेशाचा कार्यक्रम पारंपारिक वैदीक पद्धतीला नाकारून अत्यंत साधेपणाने व सत्यशोधक पद्धतीने पार पडला.सदर कार्यक्रमाचे पौरोहित्य शहापूर शाखेचे *उपाध्यक्ष शिवाचार्य उमेश पाटील* यांनी केले. *सर्व साक्षी जगत्पती।नकोच त्याला मध्यस्थी।* या उक्तीला अनुसरून वैदीक पंडित,वैदीक कर्मकांडे नाकारून आपली लग्ने,बारसे,गृहप्रवेश हे आपल्याच लोकांच्या हातून,आपली दैवते,संत-महापुरूष पूर्वज तसेच ज्यांच्यामुळे आपण या जगात आलो त्या आईवडीलांचे पूजन-स्मरण करून केले जावेत,निरर्थक कर्मकांडे नाकारून भक्तिसाठी मध्यस्थाची गरज नाही हि भूमिका घेतली जावी,आपल्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग सत्यशोधक पद्धतीने,नव्या विवेकी परंपरा निर्माण करत मित्र-नातेवाईकांसोबत उत्साहात आणि अधिक रसरशीतपणे साजरे केले जावेत हि शहापूर शाखेची सुरूवातीपासूनचीच ध्येये,उद्दिष्ट्ये व शिकवण रहिलेली आहेत.त्यालाच अनुसरून शाखेचे कार्यकर्ते नेहमीच परिवर्तनवादी भूमिका घेत असतात.शिवश्री.मोहन पाटोळे यांनी आपल्या आईवडीलांनाच प्रथम दैवत मानून त्यांचे पाद्यपूजन करून त्यांच्या हस्ते गृहप्रवेशाची फित कापली व गृहप्रवेश केला.तद्नंतर शिवाचार्य उमेश पाटील यांनी घरातील मंडळींच्या हस्ते बळीपूजन केले व आपल्या अवैदीक इष्ट देवतांचे पूजन-स्मरण करवून घेतले.गृहप्रवेशाची हि अनोखी व आदर्शवत पद्धत खुपच अभिनंदनीय व स्विकारणीय आहे.मोहन पाटोळे यांच्या या परिवर्तनवादी भूमिकेला शाखेचे *कार्यकारिणी सदस्य शिवश्री.काळूरामजी ठाकरे* यांनी प्रोत्साहन दिले व यथोचित सहकार्य केले.या कार्यक्रमास शाखेचे सदस्य शिवश्री.अजितजी पाटोळेही आवर्जून उपस्थित होते.शिवश्री.मोहन पाटोळे यांना व त्यांच्या कुटुंबियांना नूतन वास्तूप्रवेशाच्या हार्दीक शिवशुभेच्छा..!!! @शाखा तालुका शहापूर@



