युवा सेनेच्या वतीने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन …

एस.डी.ओ. खामगांव अतुल पाटोळे यांनी अवैध रेती वाहतुक करतांना मोदी नगर येथे वाहन पकडुन 353 चा गुन्हा दाखल करतो अशी धमकी देऊन रु 50,000/- रुपयांची केली मागणी…
(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)
शेगाव – . एस. डी. ओ. खामगांव अतुल पाटोळे एस.डी.ओ. खामगांव अवैध रेती वाहतुक करतांना मोदी नगर येथे वाहन पकडले असता. सौरभ महेंद्र कंकाळे, रा. गव्हाण, ता. शेगांव यांना 353 या गुन्हा दाखल करतो अशी धमकी देऊन रु 50,000/- रुपयांची मागणी केली.व 50,000/- • रुपये दिल्यानंतर अधिकारी पाटोळे यांनी 353 चा गुन्हा दाखल न करता, पो.स्टे. शेगांव येथुन वापस खामगांव आले. वरिष्ठ अधिकारी अँडी.एसपी. थोरात साहेबांनी सांगुन सुध्दा साहेबांनी सांगीतले की, मी त्यांचेवर गुन्हा दाखल करत नाही. व तेथुन निघुन आले. श्री अतुल पाटोळे साहेब खामगांव येथे अवैध प्रकारे पैसे घेऊन रॉयल्टी मॅनेज करून गाडया सोडण्याचे काम करीत आहेत. आर्थीक फायद्यासाठी शासनाचा महसूल बुडत आहे. मा. जिल्हाधिकारी यांनी धडक कार्यवाही करुन जी दहशत निर्माण केली होती. त्यांना तडा घालण्याचे काम एस.डी.एम. खामगांव हे करीत आहेत. तरी त्यांची चौकशी करून त्यांचेवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.
अन्यथा दि. 17.06.2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा येथे आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा युवा सेना तालुकाप्रमुख उमेश शेळके यांनी दिला..



