जळगावा जिल्हामहाराष्ट्र
अक्षय भालेराव याच्या खूनाचा वंचित बहुजन आघाडी तीव्र निषेध करते.

प्रति, मा.तहसिलदार सो यावल,तालुका यावलजिल्हा जळगाव
*विषय – अक्षय भालेराव याच्या खूनाचा वंचित बहुजन आघाडी तीव्र निषेध करते.*
अक्षय भालेराव या वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी असलेल्या बौध्द युवकाची नांदेड जिल्ह्य़ातील बोंढार या गावी दि 1 जून रोजी जातीयवादातून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्या गावातील जातीय तणाव दूर व्हावा आणि सामाजिक सलोखा राखून संविधानकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी व्हावी म्हणून वंचित बहुजन आघाडीने सर्व प्रयत्न केले आणि भीम जयंती गावात साजरी झाली. मात्र त्या गोष्टीचा राग मनात धरून जातीयवादी लोकांनी अक्षयवर हल्ला केला आणि त्याचा निर्घृण खून केला. अक्षय भालेराव याच्या खूनाचा वंचित बहुजन आघाडी तीव्र निषेध करते. घटना घडल्या नंतर रात्री उशिरापर्यंत थांबून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांवर दबाव टाकून तातडीने आरोपींना बेड्या ठोकण्यास भाग पाडले. दुसरी घटना ही हदगाव तालुक्यातील मौ.वाळकी (खु.) येथील आहे, या गावातील मातंग समाज हा गेल्या दोन वर्षापासून आपले उद्धारकर्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत अभिवादन करित असतात. मौ.वाळकी या गावात बौद्ध समाज हा राहात नसतानाही, येथील मातंग समाज हा ” भिमजयंती” का साजरी करतोय, हीच बाब येथील जातीयवादी मंडळीना खटकत होती, अस्वस्थ करित होती, या जातीयद्वेषातुनच भिमजयंती साजरी केल्याचा राग मनात धरून मातंग वस्तीवर रात्रीच्या वेळी लाईट बंद करून जमावाने सामुहिक जिवघेणा हल्ला केला, या हल्ल्यात मातंग समाजातील गायकवाड हा तरूण गंभीर जखमी झाला होता, सुदैवाने या हल्यात कुणाची हत्या नाही झाली तरी भविष्यात वाळकी येथील ही जातीयवादी मंडळी मातंगातील कोणत्या तरी स्वाभिमानी आंबेडकरी विचाराच्या तरूणाचा बळी घेतील, अशी शक्यता आहे. मौ.वाळकी येथील ही जातीयवादी मंडळी सामुहिक हल्ला करून न थांबता, मौ.वाळकी येथील मातंग समाजातील 15-16 तरूणावर दरोड्याचा खोटा गुन्हा नोंदवित जेलमध्ये टाकले आहेत. वरिल दोन्ही घटना वरून नांदेड जिल्ह्यातील मातंग व बौद्ध समाज हा या जातीयवादी मंडळीच्या हल्ला चा, अत्याचारा चा शिकार होत आहे हे स्पष्ट होते वरिल दोन्ही घटना बाबत नांदेड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक साहेबांनी ह्या घटना गांभीर्याने घेऊन, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जातीय अत्याचारी लोकांचा बंदोबस्त करावा, या दोन्ही गावातील घटना ची चौकशी करणेसाठी स्वतंत्र ” SIT ” ची स्थापना करावी आणि जलदगतीने तपास पूर्ण करावा, हे दोन्ही खटले जलदगती न्यायालयामार्फत चालवुन ” अक्षय भालेराव ” च्या मारेकऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी वंचित बहूजन आघाडी करित आहे. नांदेड जिल्ह्याचे मा.जिल्हाधिकारी आणि या परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक (IG ) साहेब यानी या दोन्ही घटना च्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणेची तातडीने बैठक घेऊन, ” जिल्ह्यात ” ॲट्रॉसिटी ॲक्टची कठोर अंमलबजावणी करणे बाबत व जिथे-जिथे ॲट्रॉसिटी ॲक्ट अंर्तगत गुन्हे नोंदवले जातात, अशा घटनातील पिडीता विरूद्ध 395 कलमान्वे दरोड्याची खोटे गुन्हे नोंदवले जातात, याबाबत पोलिस यंत्रणा खोटे गुन्हे नोंदवणे बाबत फारच तत्परता दाखवत आहेत, याही वस्तुस्थिती चा आढावा घ्यावा, अशी मागणी आपण करीत आहोत. या मागण्या घेऊन वंचित बहुजन आघाडी यावल तालुका विविध सामाजिक संघटनां च्या वतीने तसेच समविचारी पक्षांना सोबत घेवून अत्याचारी घटना विरूद्ध सर्व पक्षिय तीव्र आंदोलन करित आहे नावे ( व बं आघाडी तालुका. अध्यक्ष ) भगवान मेघे ( यावल तालुका महासचिव ) सुजित मेघे ( जि.उपाध्यक्ष ) शफी शेख ( जि. सचिव ) दिपक मेघे (जि. संघटक ) राजेंद्र बारी (आय टी सेल जि. प्रमुख ) सचिन बऱ्हे (यावल ता.महासचिव ) राजेश गवळी (यावल शहर अध्यक्ष ) तफुर कादरी (यावल ता. युवा कार्यकर्ता ) धिरज मेघे कुलदीप मेघे,विक्रम मेघे,विजय मेघे,वैभव तायडे,भूषण तायडे,शिवा तायडे,पंकज मेघे, गोलू तायडे,सुमा मेघे, लखन मेघे, प्रकाश सोनवणे, दिवाकर भालेराव रोशन सोनवणे अमोल तायडे,सानी मेघे,किरण तायडे,गौरव तायडे,अश्विन तायडे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते



