दिनांक 14/06/2023 मैजे माळेगाव गोंड येथे माननीय आमदार श्री राजेश एकडे यांच्या हस्ते कृषी विभागा मार्फत शेतकऱ्यासाठी आलेले मिनी किट बियाण्यांचे ( फुले संगम ) तसेच बियाण्यांचे परमिट चे वाटप ग्रामपंचायत कार्यालय येथे करण्यात आले.

///**
स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
///////////////////////////////
तसेच या गावात बियाण्यांसाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत परमिट वर बियाण्यांचे वितरण करण्यात आले. नांदुरा तालुक्यात प्रत्येक कृषी साह्यक याच्या मुख्यालयात सोयाबीन पिकाचे मिनी किट व अनुदानावर सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करण्यात आले आहे तरी शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. अनुदानावर प्रकल्पातील गावात बियाण्याचे वाटप सुरु झाले असुन् जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी विभागातील कर्मचारी याचाशी संपर्क करून याचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार श्री राजेश एकडे यांनी यावेळी केले आहे.
यावेळी आमदार श्री. राजेशभाउ एकडे. कृषी उत्पन्न बाजार समिती नांदुरा चे उपसभापती डॉक्टर प्रदीप हेलगे, सरपंच ताई ग्रामपंचायत सदस्य व कृषी विभागातील संदीप निमकर्डे
तालुका कृषी अधिकारी नांदुरा ,मंडळ कृषी अधिकारी सुनील पवार कृषी सहाय्यक राजेंद्र दांडगे ,अमोल बाठे, त्यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.