जितेंद्र आव्हाड यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल कराप्रांजलि ताई पंकज पाध्येजितेंद्र आव्हाड विरोधात भाजपा महिला आघाडी चे निवेदन

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव :- जितेंद्र आव्हाड विरोधात भाजपा महिला आघाडी चे निवेदन दिले आहे त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रांजलि ताई पंकज पाध्ये यांनी केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात असे नमूद केलं आहे की राष्ट्रवादी पक्षाकडून नेहमीच माझ्या महाराष्ट्रामध्ये महिलांना अपमानजनक वागणूक दिल्या जाते पक्षातील अनेक नेते कायम या नात्याकारनाने महिलांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतात ज्यामुळे अनेक महिलांना कायम अन्याय सहन कायम अन्याय सहन करावा लागत आहे आमच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा ताई वाघ यांच्या बद्दल वरून बदनामी महिलांच्या चरित्रावर आक्षपार्ह वक्तव्य केल्याबद्दल आमच्या समस्त महाराष्ट्रातील महिलांचे अपमान झाले त्यामुळे आज जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा याबाबत मालेगांव पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली तक्रार देताना काही माध्यमा सोबत बोलताना वाशीम महिला जिल्हा उपाध्यक्ष प्रांजलि ताई म्हनाल्या की जिजाऊ सावित्री बाई फुले यांच्या महाराष्ट्रात महिलांच्या चरित्रावर शिंतोडे उडविल्या जात आहे हे सहन केले जाणार नाही जितेंद्र आव्हाड यांनी कधी सत्ता बघितली होती ती पण हातून गेली त्याच्या त्रास त्यांना होत असेल तर राष्ट्रवादी वाल्यांनी त्यांचा चांगल्या डॉ कडे उपचार करावा असा सल्ला सुचविला आमच्या महीला मोर्चा च्या प्रदेश अध्यक्षा चित्रा ताई वाघ यांची मानहानी करण्याचा त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास देण्याचा आणि सामाजिक जीवनातून उठविण्याचा प्रकार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे पण आम्ही भाजपा महिला आघाडी कधीच खपून घेणार नाही त्या वेळी सोबत भाजपा च्या मालेगांव शहर अध्यक्ष,अणीता ताई शर्मा , भाजपा कार्यकर्ता, सुनीता ताई गायकवाड, मनोरमा ताई ठाकुर.अंजलीताई देशमुख,जिया खान सर,ता,सरचीटनीस,सुनील भाऊ मुंदडा ता, उपाध्यक्ष गोपीचंद गवई, शीलाताई भगत , इत्यादी उपस्थित होत्या.



