विदर्भ

वारकरी समुदायावर अमानुष लाठी चार्ज केल्याप्रकरणी तेल्हारा तहसीलला शिवसेनेचे निदर्शने व निवेदन

वारकरी समुदायावर अमानुष लाठी चार्ज केल्याप्रकरणी तेल्हारा तहसीलला शिवसेनेचे निदर्शने व निवेदन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा विजय घोडे तालुका प्रतिनिधी

तेल्हारा दि.12 आळंदी मध्ये वारकरी समुदायावर जो अमानुष लाठीचार्ज करण्यात आला त्याप्रकरणी जाहीर निषेधार्थ तसेच दोषींवर लवकरात लवकर कारवाई करून मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी झालेल्या निंदनीय प्रकाराची जबाबदारी स्वीकारून त्वरित आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशा प्रकारचे निवेदन तेल्हारा शहर व ग्रामीण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे देण्यात आले.
गेल्या शेकडो वर्षापासून महाराष्ट्राला एक वारकरी परंपरेचा इतिहास आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून मोठमोठ्या पालख्या लाखोंच्या संख्येने मोठ्या उत्साहात ऊन वारा पावसाचा विचार न करता विठुरायाच्या नामस्मरणात टाळ मृदुंगाच्या गजरात तल्लीन होऊन पायदळ वारी करत पंढरपूरला जात असतात. पुण्यातील संत नगरी आळंदी येथे दरवर्षीप्रमाणे संत ज्ञानेश्वर माऊलींचा मोठ्या उत्साहात प्रस्थानाचा पालखी सोहळा असते पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी प्रस्थान करण्यासाठी जमलेल्या वारकरी समुदायावर पोलीस प्रशासनाकडुन कारण नसताना त्यांच्यावर लाठी चार्ज करण्यात आला त्याचा आम्ही शिवसेना तेल्हारा तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करतो व एवढ्या दशकापासून सुरू असलेल्याचा या प्रथेला अशा पद्धतीने अमानुष पद्धतीने लाठी चार्ज करणे हा घृणास्पद प्रकार देशांमध्ये पहिल्यांदा घडला व राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री झालेल्या प्रकाराबद्दल तोंडातून एक शब्दही न काढता मूग गिळून गप्प बसलेले आहेत तरी झालेल्या प्रकाराबद्दल आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो व या निंदनीय झालेल्या प्रकाराची मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून नैतिकतेने आपल्या पदाचा आपण त्वरित राजीनामा द्यावा व तसेच दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि असा प्रकार पुन्हा या देशात किंवा महाराष्ट्रात घडला नाही पाहिजे याची प्रशासनाने दखल घ्यावी. यावेळी अकोला जिल्ह्याचे उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे तेल्हारा शहर प्रमुख विवेक खारोडे उप तालुकाप्रमुख पुरुषोत्तमगावंडे विधानसभा सहसंघटक पप्पू शेठ सोनटक्के विधानसभा सह समन्वयक गजानन मोरखडे उपशहर प्रमुख गौतम दामोदर माजी शहर प्रमुख राजेश वानखडे युवा सेनेचे प्रज्वल मोहोळ सुधाकर गावंडे निलेश धनगर राहुल पुदाके प्रकाश खारोडे संजय देशमुख आदित्य उमाळे कैलास श्रीवास संभाजी वानखडे निशांत नेमाडे तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे असंख्य शिवसैनिक उपस्थित होते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button