बुलढाणामहाराष्ट्र

गेल्या वर्षीपेक्षा यंदा जास्त नापास……

स्टार भारत लाईव्ह ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहुरकर नवी मुंबई बारावीत गेल्यावर्षीपेक्षा यंदा नवी मुंबईचा निकाल घटला. गेल्या वर्षी ९५.१६ टक्के असलेला निकाल यंदा ९०.६४ टक्क्यांवर आला. यंदाही निकालामध्ये मुलींनीच बाजी मारली. ६० हून अधिक महाविद्यालयांतून १५,८२३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी १५,७२७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामधून १४,०८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल ४० टक्के लागला आहे. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक निकाल मुरबाड भागाचा लागला आहे. नापास होण्यात मुरबाड सर्वांत मागे राहिला आहे. कल्याण-डोंबिवलीपाठोपाठ ठाणे शहरामध्ये नापास विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. कल्याण ग्रामीण भागात १५४ विद्यार्थी, अंबरनाथमधून ६५२, भिवंडीमध्ये ४२०, मुरबाडमध्ये ६७, शहापूरमध्ये ३९५, ठाणे शहरात २०५९, नवी मुंबईत १६४०, भाईंदरमध्ये ६३६, कल्याण-डोंबिवलीमध्ये २७६०, उल्हासनगरमध्ये १२६४ तर भिवंडीमध्ये ९०० विद्यार्थी नापास झाले आहेत. जिल्ह्यात ४४८९६ उत्तीर्ण मुलांपैकी ६८९५ मुले, तर ४२८५३ मुलींपैकी ४०५२ मुली नापास झाल्या आहेत. 🖋️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button