बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हतेडी बुद्रुक बुलढाणा या महाविद्यालयाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावं अशी हतेडी बुद्रुक गावातील जनतेची जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे मागणी…!!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,

प्रतिनिधी संग्रामपूर ,रतन भगत.

दि.१२/३/२०२६.(हतेडी बु.) बुलढाणा:-सविस्तर वृत्त असे की, ग्रामपंचायत हतेडी बुद्रुक ,आवळखेड अंतर्गत दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ठीक १० वाजता ग्रामसभा घेण्यात आली होती. सदर ग्रामसभेत श्री विनोद वामन जाधव यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील हतेडी बु. बुलढाणा या महाविद्यालयाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा ठराव मांडला होता. सदर ठरावास श्री ज्ञानेश्वर शंकर जाधव यांनी अनुमोदन दिले. सदर ठराव ग्रामसभेत अविरोध मंजूर करण्यात आला आहे. ग्रामपंचायत बु. अंतर्गत येणारी २०.८० हेक्टर जमीन ई क्लास या शासकीय महाविद्यालयास ठराव अंतर्गत देण्यात आलेली आहे. त्यामुळे सदर बाबीचा विचार करून तसेच हतेडी बु. येथील जनतेच्या भावनेचा आदर करून या महाविद्यालयाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय महाविद्यालय असे नाव देण्यात यावे. अशी मागणी सदर परिसरातील जनतेने केलेली आहे. असे निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांना ज्ञानेश्वर शंकर जाधव ,विनोद वामन जाधव, अंबादास जाधव ,किरण इंगळे, संदीप जाधव इत्यादी कार्यकर्ते निवेदन देतेवेळी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button