राजे संभाजी अकॅडमी तेल्हारा शाखेचा यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा विजय घोडे तालुका प्रतिनिधी
तेल्हारा दि.24. “परिपूर्ण कोणीही नसतो पण प्रत्येक जण परिपूर्ण होऊ शकतो” या ब्रीदाने राजे संभाजी अकॅडमी ची केलेली सुरुवात आज परत एकदा आकाशाचे नवे शिखर गाठत नावलौकिक करीत आहे. उद्या दिनांक 25 5 2023 ला सकाळी आठ वाजता साई मंगल कार्यालय तेल्हारा येथे 2023 या वर्षात यशवंत झालेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या राजे संभाजी स्पर्धा परीक्षा अकॅडमी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा सत्कार करण्याचे योजिले आहे या अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थी शासकीय व निमशासकीय सेवेत रुजू झालेले आहेत असे सुमारे 14 यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे यामध्ये सर्वप्रथम खुशी धरमकार महाराष्ट्र पोलीस अकोला, प्रज्ञा वाकोडे महाराष्ट्र पोलीस मुंबई, राम सर गंगाळ महाराष्ट्र पोलीस अकोला ,शुभम लोंढे महाराष्ट्र पोलीस अकोला, चेतन कुमकर महाराष्ट्र पोलीस अकोला ,प्रफुल खोडे महाराष्ट्र पोलीस अकोला मुंबई, उमेश वाकोडे महाराष्ट्र पोलीस अकोला, विकास पवार महाराष्ट्र पोलीस यवतमाळ ,वैभव चंदन बी आर ओ आर्मी ,अभिजीत पोहरकर भारतीय रेल्वे ,श्रीकांत चव्हाण भारतीय रेल्वे ,रुपेश इंगळे भारतीय रेल्वे ,विजय हिवराळे भारतीय रेल्वे ,प्रदीप गवळी भारतीय रेल्वे आदींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते यावेळी होणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन राजे संभाजी अकॅडमी अकोटचे संचालक राजीव खारोडे सर मार्गदर्शक पुरुषोत्तम आढाव [क्लार्क ]सर तथा तेल्हारा शाखेचे सहसंचालक ताकोते सर यांनी केले आहे .
तसेच या कार्यक्रमाचे प्रसार माध्यमाद्वारे लाईव्ह प्रक्षेपण नवीनच सुरू झालेल्या
“स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस” या वृत्तसंस्थेच्या माध्यमातून होणार आहे



