शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत खामगाव येथे महाशिबिराचे आयोजन

…. जीडी रोकडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत शासनाच्या विविध योजनेची माहिती देणारे व लाभ देणारे महाशिबिरा चे आयोजन खामगाव येथे 25 मे रोजी करण्यात येणार आह. महाराष्ट्र शासना च्या धोरणानुसार विविध विभाग मार्फत पुण्यात येणारे शासकीय लाभ हे पारदर्शक, गतिमान पद्धतीने एका क्षेत्राखाली पुरवण्यासाठी शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत स्थानिक आमदार आकाश दादा फुंडकर यांचेअध्यक्षतेखाली तालुक्यामध्ये शासना ची विविध योजनांची माहिती तसेच शासनाचे लाभ लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्याकरिता श्रीहरी लॉन्स खामगाव येथे 25 5 2023 रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून या महा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . पंचायत समिती नगर परिषद तहसील कार्यालय संबंधित विविध योजनांची माहिती जोपर्यंत नागरिकांपर्यंत पोचणार नाही तोपर्यंत विकास होणार नाही तसेच या महा शिबिरामध्ये गरजू लाभार्थी यांना थेट लाभ देण्यात येणार आहे .विशेष लक्ष देऊन खरे लाभार्थी त्यांना थेट लाभ देणारे देण्यात येणार आहे तरी सर्व तालुक्यातील नागरिकांनी येथे उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे……..



