शेतकऱ्यांची फसवणूक करुण पसार झालेल्या व्यापारी राहुल चौधरीला अटक करा. शेतकऱ्यांची पो.स्टे.वर धडक.,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,स्टार भारत लाइव महाराष्ट्र एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

शेगाव/
तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचा शेतीमाल विकत घेऊन अंदाजे १० कोटी रुपये घेऊन पसार झालेल्या आरोपीला अटक करा अशी मागणी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांचेसह शेतकऱ्यांनी पोलिस प्रशासनाला केली आहे. शेतकऱ्यांनी १० दिवसांपूर्वी पसार झालेल्या व्यापाऱ्याची तक्रार करुनही पोलीसांनी व्यापाऱ्याचा शोध घेतला नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. भुसावळ येथील व्यापारी राहुल देविदास चौधरी हा एक वर्षापासून शेगावात वास्तव्यास होता त्याने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करुन तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी केला. आणि अंदाजे १० ते १२ कोटी रुपयाचा माल विकत घेऊन पसार झाला आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारी वरुन शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपिला अद्यापही अटक करण्यात आली नसल्याने प्रशांत डिक्कर यांनी शेतकऱ्यांसह शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार वडगावकर यांची भेट घेऊन तत्काळ आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याची मागणी रेटून धरली. शहर पोलिस स्टेशनला प्राप्त असलेल्या २४ शेतकऱ्यांच्या तक्रारी ठाणेदार अनिल गोपाळ यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार वडगावर यांच्या कडे सुपुर्द केल्या. सदर प्रकरणाची कचुन चौकशी चालु असुन आरोपीचा शोध घेण्यासाठी कडक शोधमोहीम राबविण्यात आली आहे. असे ठाणेदार वडगावकर यांनी आश्वाशित केले. तसेच प्रशांत डिक्कर यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांची जिल्हा कार्यालय बुलढाणा येथे भेट घेऊन शेतकऱ्यांची आपबिती कथन करित सदर प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तत्काळ वर्ग करण्याची मागणी लेखी पत्रातुन केली आहे. यावेळी संतोष खर्डे, सचिन धनोकार, सचिन दिंडोकार,सुरेश शेगोकार, प्रशांत शेगोकार, नंदलाल दिंडोकार, दिगाबंर दिंडोकार, दिगाबंर खेर्डे, आकाश नावकार, सुनिल गणोरकार, यांच्या सह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते



