खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रराजकीय
फडणवीस साहेब,मृतांचे टाळूवरचे लोणी पोहचले का?

महोदय, श्रीमान देवेंद्र फडणवीस साहेब,आपण जबाबदार पदावर आहात .तर आपण कोणतेही वचन,अभिवचन,भाषण वास्तविक परिस्थिती वर दिले पाहिजे.असा लोकशाही चा संकेत आहे.तो संकेत पाळून आम्ही आपणावर आक्षेप घेत आहोत कि,
आपण पुणे येथे जाहीर सभेत बोलले कि,"ज्या लोकांनी कोरानाकाळात मृतांच्या टाळूवरचे लोणी खाल्ले त्यांना आम्ही माफ करणार नाहीत."यातील आम्ही म्हणजे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री.वैयक्तिक देवेंद्र फडणवीस नाहीत.आपले हे वचन ऐकून मला खूप बरे वाटले.सापडला!एक मंत्री प्रामाणिक सापडला.एक मंत्री महाराष्ट्र सरकार मधे आहेत,ज्यांना भ्रष्टाचाराची आणि भ्रष्टाचारीची चीड आलेली दिसते.
मी मुख्य विषय व उद्देश आपणापुढे ठेवतो.आपल्या मांडीला मांडी लावून बसलेले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत गुवाहाटी ला पळून गेलेले श्री गुलाबराव पाटील,हे जळगाव जिल्हा चे पालकमंत्री आहेत.हेच महाशय कोरोना काळात जळगाव जिल्हा पालकमंत्री होते.यांनी कोरोना काळात धुळ्याचे भास्कर वाघ यांना लाजवेल असा नियोजन बद्ध भ्रष्टाचार केलेला आहे.कोरोना महामारी काळात सरकारने दिलेला निधी , रूग्णांच्या औषधी व वैद्यकीय यंत्रसामुग्री साठी होता.पण या मंत्री ने तो कागदावर खरेदी दाखवून परस्पर हजम केला आहे.परिणामी जळगाव जिल्ह्यातील २५९१रूग्ण मेले.त्या मृतांच्या टाळूवरचे लोणी या पालकमंत्री ने चाटले.असे लिखीत पत्र जळगाव जिल्हा सिव्हिल सर्जन ने दिलेले आहे.असे प्रतिज्ञापत्र जळगाव जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोर्टात सादर केले आहे.आमचेकडे याबाबत कागदोपत्री पुरावा उपलब्ध आहे.आपणास हवे असेल तर आम्ही प्रत्यक्ष येऊन सादर करू शकतो.
या विरोधात आम्ही तत्कालीन विधानसभा अधिवेशनात आमदार चिमणराव पाटील यांनी प्रश्न केला.तत्कालिन विधानपरिषदेत आमदार विलास पोतनीस यांनी प्रश्न केला.तर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची जबाबदारी होती कि,या पालकमंत्री चा राजीनामा घेऊन चौकशी केली पाहिजे.पण ठाकरेंना भ्रष्टाचाराचे,लांचखोरीचे काहीच वावडे नाही.कदाचित मृतांच्या टाळूवरचे लोणीचा हिस्सा त्यांनीही चाखला असेल.संशयाला वाव आहे.आपण त्या वेळी विरोधी पक्षनेता होते.जबाबदारी तुमची सुद्धा होतीच.आता सुद्धा आहेच.
आता मंत्री मंडळ बदलले.तेंव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्ही मुंबई, नंदनवन बंगल्यात समक्ष भेटून सांगितले कि, गुलाबराव पाटील यांना पुन्हा मंत्री बनवू नका.म्हणे आम्हाला " ह्योच माणूस मंत्री पाहिजे." चुकीची मानसिकता आहे.आता जळगाव जिल्ह्यातील आमदार एकनाथ खडसे यांनी सुद्धा गुलाबराव पाटील यांनी केलेल्या भ्रष्टाचार विरोधात विधानपरिषदेत प्रश्न केला आहे.जर तीन आमदार भ्रष्टाचार विरोधात आक्षेप घेत आहेत तरीही सरकार दुर्लक्ष करीत असेल तर सरकारचा मुख्य हेतू भ्रष्टाचार करणे ,हेच सिद्ध होत आहे.
आता आपण उपमुख्यमंत्री व गृहमंत्री या जबाबदार पदावरून जे वचन दिले ते पाळणे आपली जबाबदारी आहेच.जर आपण गुलाबराव पाटील यांना मंत्रिपदावरून डच्चू देऊन चौकशी केली नाही तर आम्ही महाराष्ट्रातील १३ कोटी लोकांची खात्री होईल कि, मंत्र्यांनी भ्रष्टाचार करणे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना मान्य आहे.तर प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तरी का प्रामाणिकपणे काम करावे? ज्याला जे मिळेल ते त्याने ते चोरावे.असा जी आर किंवा विधेयक पारीत करण्यात येईल.
मंत्री महोदय श्रीमान फडणवीस साहेब,जर आपण गुलाबराव पाटील यांना भ्रष्टाचार करण्यासाठी अभय दिले तर आम्ही निष्कर्ष काढतो कि,आपणास सुद्धा उद्धव ठाकरे यांचे प्रमाणेच मृतांचे टाळूवरचे लोणी पॅकेज मिळाले असावे.किंवा ज्यांनी ज्यांनी असे लोणी चोरले असेल त्यांनी त्याचा काही हिस्सा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे पाठवावा.अन्यथा कारवाई करण्यात येईल.
सरकार चालवणाऱ्या जबाबदार व शीर्ष मंत्र्यांनी जनतेशी प्रामाणिक असावे.आपण श्रीमान देवेंद्र फडणवीस व्यक्तीश: प्रामाणिक आहात किंवा नाही,याची ही अग्निपरीक्षा आहे.
… शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव



