खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

कुलर चा शॉक लागून 9 वर्षाच्या बालिकेचा मुर्त्यू

मुक्ताईनगर : ९ वा वाढदिवस असल्याने सायंकाळी सर्व कुटुंबीय बालिकेचा वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन करीत असताना आज शुक्रवारी १९ मे २०२३ रोजी सायं ६:३० वाजेच्या सुमारास कुलर चा जबरजस्त शॉक बसल्याने मृत्यू झाल्याची दुदैवी घटना मुक्ताईनगर शहरातील प्रभाग क्रं.१२ मधील जिजाऊ नगर मध्ये घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 याबाबत सविस्तर वृत्त असे की, वैष्णवी चेतन सनान्से, हिचे आज कुलरचा शाॅक लागुन दुर्दैवी निधन झाले, परमेश्वर बालिकेच्या आत्म्याला शांती देवो, गोपाळ बळिराम सनान्से रा. चिचोंल ह. मु. मुक्ताईनगर नात होती. परमेश्वराने आज तिच्या वाढदिवसाच्या दिवशी काळाने घात केला, वैष्णवी ची अंतिम यात्रा रहाते घर जिजाऊ नगर, मुक्ताई नगर येथुन उदया. दिनांक 20/5/2023 शनिवार रोजी सकाळी 9 वाजता निघणार आहे. परमेश्वर वैष्णवी च्या आत्म्याला चिर शांती देवो.सदरील बालिका ओम साई सेवा फाऊंडेशन चे अध्यक्ष सुभाष सनान्से यांची पुतणी तर चेतन महाराज  याची कन्या होती.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button