मो. दानिश याला आजन्म कारावास

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर
शेगाव शहरातील जगदंबा चौकातील माऊली टॉवर येथील मेस अॅन्ड कॅन्टीन मध्ये झालेल्या खून प्रकरणातील एका आरोपीला खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म करावासाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात न्यायालयाने १३ साक्षीदार तपासले. त्यापैकी ‘सीसीटीव्ही फुटेज’चा प्राथमिक पुरावा महत्त्वाचा ठरला.
मिळालेल्या माहितीनुसार, ६ मे २०१८ रोजी आठवडी बाजारातील मोहम्मद शोएब मोहम्मद सलीम या २२ वर्षीय युवकाचा खून करण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी मो. दानिश जाहीद हुसेन याच्यासह दोघांविरुद्ध कलम ३०२, २०१, १२० बी. ३४० नुसार गुन्हा दाखल करत प्रकरण न्यायालयात दाखल केले. घटनेची पार्श्वभूमी अशी की, ६ में २०१८ रोजी मो. शोएब मो. सलीम हा ‘माऊली टॉवर’ मधील मेस अॅन्ड कॅन्टीन मध्ये बसलेला होता. दरम्यान संध्याकाळी
७ वाजताच्या सुमारास आरोपी मो. दानिश जाहीर हुसेन हा त्या ठिकाणी आला व वाद घालून मो. शोएब चा मोबाईल हिसकावून घेतला व खिशातील चाकूने त्याच्या मानेवर, पोटावर व गालावर १९ वार केले. त्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला दवाखान्यात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. घटनेच्या दोन महिन्यापूर्वी दोघांमध्ये झालेला वाद मिटविण्यात आला होता. मात्र पुन्हा हा वाद उफाळून आल्याने सदर घटना घडली होती. अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अॅड. रजनी बावस्कर (भालेराव) यांनी अत्यंत बारकाईने हा गुन्ह्यातील मुद्दे न्यायालयासमोर मांडत प्रभावी युक्तिवाद केल्यानंतर खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. एस. कुलकर्णी यांनी आज आरोपी मोहम्मद दानिश याला आजन्म कारावासाची शिक्षा तसेच ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली



