जळगाव संग्रामपूर शेंगाव तालुक्यातील ५१ हजार शेतकऱ्यांना मिळणार सततच्या पावसाच्या नुकसानीची मदत

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
स्टार भारत लाइव महाराष्ट्र एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे,,,,,,
,,,,,,,,।
स्वाभिमानीच्या प्रयत्नाला यश
संग्रामपूर- गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात सतत पावसाने शेतातील कापुस, सोयाबीन, उडीद,मूग,ज्वारी व मका इत्यादी नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचे शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केले आहे. सततच्या पावसाने झालेल्या पिक नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई द्यावी,अशी राज्यातुन पहिली मागणी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी बुलढाणा जिल्ह्यातुन केली होती. आणि नुकसान झाल्या पासून चांगलीच रेटुन धरली आहे. सतत पावसामुळे शेतातील उभे पिके सडुन गेली आहेत. परंतु ज्या मंडळात ६५ मिलिमीटर पेक्षा कमी पाऊस झाला आहे , अशा शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्याचा लोकप्रतिनिधिचा डाव स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या लक्षात येताच प्रशांत डिक्कर यांनी संग्रामपूर, जळगाव, शेगाव तालुक्यातील गावा-गावात शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन शासन प्रशासनाच्या विरोधात दंड थोपटून चांगलेच रान उठवले होते. सततच्या पावसाने नुकसान झालेल्या सर्वच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परिणामाची चिंता न करता आक्रमक आंदोलने केली. मग ते १४ सप्टेंबर रोजी माननीय राजु शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली संग्रामपूर तहसीलवर शेतकऱ्यांचा दखल मोर्चा असेल, ४ आक्टोबर रोजी शेगाव तहसिलवरील आसुड मोर्चा असेल, वानखेड शेतशिवारात ५ तास पाण्यात बसुन आंदोलन असेल, किंवा दिवाळीच्या दिवशी हातात विषारी औषधांचे डबे घेऊन एस डि ओ कार्यालया समोरील आत्मदहन आंदोलन असेल. असे अनेक आंदोलने करुन शासनाकडे सतत पाठपुरावा केला असल्याने अखेर सरकारने किमान १० मी.मी सतत पाच दिवस पाऊस पडल्यास नैसर्गिक आपत्ती घोषित करुन सततच्या पावसाने नुकसान झालेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असुन १६ मे रोजी झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटपासाठी मदत व पुनर्वसन विभागाला निर्देश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ५७ हजार ५७७ हेक्टरवरील बाधित क्षेत्रफळाची ८२ हजार ९०० शेतकऱ्यांना मदतीचा लाभ मिळणार आहे. यापैकी जळगाव जामोद मतदार संघासाठी हि मदत एक आशेचा किरण ठरणार आहे. संग्रामपूर जळगाव व शेगाव तालुक्यातील ३७ हजार ५०० हेक्टर बाधित क्षेत्रफळाची ५१ हजार २४३ शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याने जळगाव जामोद मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी हा एक मोठा दिलासा असणार आहे. त्यामुळे सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या आंदोलनात १२० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांवर १३५ सह विविध कलमान्वे गुन्हे दाखल झाले आहेत. तरीसुद्धा वेळप्रसंग जिव गेला तरी बेहत्तर पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही जो पर्यंत शेतकऱ्यांना नुकसानिची रक्कम बँक खात्यावर जमा होत नाही तो पर्यंत लढत राहणार असल्याचे प्रशांत डिक्कर यांनी बोलतांना सांगितले.



