महाराष्ट्र

जिल्हा अधिकारी कार्यालय अकोला येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन

*स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी विजय घोडे. कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य,महाराष्ट्र शासनाद्वारे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर उद्या दिनांक 12 ला सकाळी आठ ते बारा या वेळेत आयोजित केले आहे. या शिबिरामध्ये दहावि बारावी नंतर करिअरच्या विविध संधीबद्दल, बारावीनंतर अभ्यास व प्रवेश प्रक्रिया कार्यक्रमाबद्दल, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील कार्यक्रम प्रवेश प्रक्रिया व रोजगार संधीबद्दल, अल्पमुदतीचे कौशल्य विकास अभ्यासक्रम व रोजगार संधी ,तसेच व्यक्तिमत्व विकास बद्दल माहिती मिळणार आहे शिबिरामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉक्टर श्री ज्ञानसागर भोकरे सूक्ष्मजीवशास्त्र विभाग शंकरलाल खंडेलवाल महाराष्ट्र अकोला हे विविध संधी 10 वी 12 वी नंतर या विषयावर मार्गदर्शन करतील, मा. श्री सचिनजी बुरघाटे. एस्पायर इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट यांचा विषय व्यक्तिमत्व विकासाचे करिअर घडविण्याचे महत्त्व व माननीय श्री गजाननजी कोरे संचालक राष्ट्रमाता जिजाऊ करिअर कौन्सिलिंग केंद्र अमरावती यांचा विषय सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी व मा.श्री निलेशजी देशमुख वरिष्ठ प्रबंधक सेंट्रल बँक ऑफ इंडिया क्षेत्रीय कार्यालय अकोला यांचा विषय स्वयंरोजगार करिता अर्थसहाय्याची उपलब्धता व मार्गदर्शन उद्या दिनांक 12 5 2023 शुक्रवारला स्थळ नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर अकोला येथे ठीक सकाळी 8 ते 12 या वेळेत आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे आयोजक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अकोला जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला हे आहेत तसेच कार्यक्रम सोहळ्याचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने मा. श्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अकोला जिल्हा यांच्या हस्ते होईल कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मा श्री संजय धोत्रे खासदार अकोला तर मा श्री अमोल मिटकरी आमदार विधान परिषद, मा. श्री वसंत खंडेलवाल आमदार विधान परिषद, मा. श्री गोवर्धन शर्मा आमदार विधान सभा मा. श्री किरण सरनाईक आमदार विधान परिषद .मा. श्री धीरज लिंगाडे आमदार विधान परिषद ,मा. श्री रणधीर सावरकर आमदार विधानसभा हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून असणार आहेत तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.श्रीमती निमा अरोरा भा प्र से जिल्हाधिकारी अकोला असतील तसेच प्रमुख उपस्थिती मा. श्री सौरभ कटियार भाप्रसे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला मा. श्रीमती सुचिता पाटेकर शिक्षणाधिकारी माध्यमिक अकोला मा. श्री मिलिंद दुसाने जिल्हा माहिती अधिकारी अकोला. या कार्यक्रमाचे विनीत गजानन चोपडे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अकोला जिल्हा. दत्तात्रय ठाकरे सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला.हे आहेत.गरजु ईच्छुक प्रशिक्षणार्थ्यांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन रोजगाराकरिता तसेच प्रशिक्षणाकरिता ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button