तेल्हारा शहरामध्ये वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 114 वि ग्रामजयंती साजरी*

* स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी.अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ तेल्हारा मा. तालुका सेवाधीकारी डॉ.भाष्कर मुळे व महिला जिल्हा सेवाधीकारी संगीताताई गावंडे यांच्या उपस्थितीमध्ये प्रताप चौक तेल्हारा येथील दुर्गा मंदिरामध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 114 वी ग्राम जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम डॉ भास्करराव मुळे यांच्या हस्ते वंदनीय तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन तसेच हार अर्पण करण्यात आले. नंतर सामुदायिक प्रार्थना करण्यात आली या सामुदायिक प्रार्थनेला गुरुदेव प्रेमी तेल्हारा शहरातील चंद्रकांत मोरे राजूभाऊ निर्मळ देवानंद ठाकरे मोहन तायडे सौ कल्पना मोरे श्रीमती पुष्पा लोंढे वैष्णवी मोरे संतोष पवार वाकोडी इंगळे काका आयुष रोडगे कृष्णा मोरे यश गावंडे आदित्य टाले सुनील खारोडे गजानन मामनकर रामदास टाले, विनोद रोजतकर यांची उपस्थिती लाभली. सामुदायिक प्रार्थने नंतर भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रार्थनेचे सूचक चंद्रकांत मोरे होते तथा मार्गदर्शक डॉ मुळे ,संगीतातताई गावंडे ह्या होत्या. उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. माणिकदेव बंडूजी इंगळे 30/04/1909. हे तुकडोजी महाराजांचे नाव आहे भारतामधील महाराष्ट्रातले अध्यात्मिक संत होते त्यांचा जन्म अमरावती येथे यावली गावामध्ये एका गरीब परिवारामध्ये झाला तुकडोजी महाराज आडकोजी महाराजांचे शिष्य होते तुकडोजी महाराज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये रस्ते निर्मानासहित समाज सुधारकांमध्ये सहभागी होते त्यांच्याकडून सुरू केलेले विकासाचे कार्यक्रम त्यांच्या मृत्यूनंतरही कुशलतेने कार्य करत आहे त्यांनी ग्रामगीता लिहिली जी ग्रामगीता ग्रामीण विकासाच्या साधनांचे वर्णन करते त्यांच्या जीवनातील विशेष कार्य 1941 मध्ये तुकडोजी महाराजांनी नागरिक प्रतिरोधाच्या व्यक्तिगत कार्यांचे प्रदर्शन करवते ज्याला सत्याग्रह म्हणतात आणि भारत छोडो आंदोलनामध्ये जन आधारात भाग घेतला त्यांना 1942 मध्ये अटक केली होती आणि नागपूर रायपूर सेंट्रल जेलमध्ये कैद केले होते जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा त्यांनी ग्रामीण पुनर्निर्मानावर लक्ष केंद्रित केले त्यांनी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली आणि एकीकृत ग्रामीण विकास कामा करिता कार्यालय कार्यक्रम विकसित केले डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे भारताचे पहिले राष्ट्रपती होते त्यांनी त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी प्रदान केली आणखीन बरेचसे उल्लेखनीय कार्य त्यांनी आपल्या जीवनात केले त्यांचा मृत्यू 11/10/1968 ला झाला ते विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक उपाध्यक्षां मधून एक होते.या वर्षीचा जयंती उत्सव आनंदाने पार पाडण्याकरीता अनेकांनी परिश्रम घेतले.



